हरित ऊर्जेच्या साह्याने माथेरान स्थानकाचा कायापालट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

मुंबई - माथेरानच्या मिनी ट्रेनची लोकप्रियता परदेशी पर्यटकांमध्ये वाढवण्यासाठी मध्य रेल्वेने मिनी ट्रेनला नुकतेच वाफेचे इंजिन बसवले. सौरऊर्जा, पवनचक्कीतून मिळणाऱ्या ऊर्जेच्या साह्याने माथेरान स्थानकाचा हरित ऊर्जा प्रकल्पांतर्गत कायापालट केला जाणार आहे.

माथेरानच्या मिनी ट्रेनच्या वाफेच्या इंजिनाबाबत अनेकांना आकर्षण आहे. स्थानकात आता ऊर्जाबचतीचा संकल्प पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने या मार्गावरील २१ कि.मी.च्या पट्ट्यातील जुम्मापट्टी, वॉटरपाईप, अमन लॉज या भागांत ५०० ते एक हजार वॉट पॉवरचे ऊर्जा पॅनेल बसवले आहेत. सहा किलो वॉट वीजनिर्मिती करणारी पवनचक्की, स्थानकातील एलईडी बल्ब, पंख्यांमुळे वीजबिलात सुमारे दोन लाखांहून अधिक रकमेची बचत होणार आहे. या योजनेसाठी मध्य रेल्वेला एकूण १६ लाख रुपये खर्च आला.

Web Title: mini train matheran green power