पारदर्शक डब्यासह मिनी ट्रेनची चाचणी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 फेब्रुवारी 2019

१०२ वर्षांच्या वाफेच्या इंजिनावर धावली माथेरानची राणी
नेरळ - पर्यटकांना घाटमार्गाने प्रवास करताना निसर्ग व आकाश न्याहाळता यावे म्हणून नेरळ-माथेरान-नेरळ मिनी ट्रेनच्या ताफ्यात पारदर्शक (विस्टाडोम) प्रवासी डबे बनवण्यात आले आहेत. त्यांची चाचणी शनिवारी नेरळ स्थानकात घेण्यात आली. विशेष प्रवासी डब्याच्या चाचणीसाठी तब्बल १०२ वर्षांपूर्वीचे मिनी ट्रेनचे वाफेचे इंजिन लावण्यात आले होते.

माथेरानच्या निसर्गसौंदर्यांने  नटलेले माथेरान न्याहाळण्यासाठी पारदर्शक प्रवासी डबे आणण्यात आले आहेत. त्यांची चाचणी घेण्यात आली. त्या वेळी मध्य रेल्वेने पारदर्शक प्रवासी डबे बसवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार विस्टाडोम प्रवासी डबे नेरळ लोकोमध्ये आणण्यात आले आहेत. वातानुकूलित पारदर्शक डबा लावून प्रवासी सेवा देण्यासाठी इच्छुक असलेल्या रेल्वेने शनिवारी एक विस्टाडोम प्रवासी डबा लावलेली मिनी ट्रेन नेरळ स्थानकातून चालवण्यात आली. तिला साजेसे वाफेवर चालणारे इंजिन जोडण्यात आले होते. विशेष गाडीचे मोटरमन होते सुनील मिसाळ. दीड किलोमीटरनंतर विशेष गाडी पुन्हा नेरळला परतली. त्यासाठी एनडीएम १-४०१ इंजिन लावण्यात आले होते.

डब्याची वैशिष्ट्ये
    प्रवाशांना आकाश न्याहाळता येणार
    परिसर बघण्यासाठी मोठ्या काचेच्या खिडक्‍या
    बसण्यासाठी आकर्षक व्यवस्था
    एलईडी टीव्ही, वातानुकूलित यंत्र आणि फ्रीज
    आसन मागे-पुढे सरकते व बेडसारखे सरळ होते

Web Title: Mini Train Test