सहकारमंत्री देशमुखांवर कारवाई करा - सचिन सावंत

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

मुंबई - नोटबंदीच्या निर्णयानंतर काळ्या पैशावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने बेनामी संपत्तीविरोधी कायदा आणला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल ग्रुपच्या गाडीत सापडलेली रक्कम हाही काळा पैसा असल्याचा आरोप करून त्यांच्यावर या कायद्यानुसार राज्यातील पहिला गुन्हा दाखल करावा, त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या बॅंकेच्या गाडीतून निवडणूक आयोगाने 91 लाख 50 हजार रुपयांची रोकड जप्त केली. ही संपूर्ण रक्कम चलनातून बंद केलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांमध्ये आहे. याबाबत सुभाष देशमुख यांनी केलेले खुलासेही समाधानकारक नसून दिशाभूल करणारे आहेत. हा पैसा काळा पैसा असून, मुख्यमंत्र्यांच्या दबाबामुळेच देशमुखांवर कारवाई होत नसल्याचा आरोप सावंत यांनी केला. देशमुख ज्या खात्याचे मंत्री आहेत त्याच खात्याचा कनिष्ठ अधिकारी मंत्र्यांची चौकशी काय करणार असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला. या मुख्यमंत्र्यांनी सुभाष देशमुखांचा राजीनामा घेऊन संपूर्ण प्रकरणाची प्राप्तिकर खात्याकडून तसेच अंमलबजावणी संचलनालयाकडून चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Web Title: Minister to act on Deshmumkh