Mumbai Metro 3 प्रकल्पाच्या पाहणीनंतर मंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 December 2019

महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्विकारल्यावर सर्व प्रथम मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाची पहाणी केली. एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबईतील आझाद मैदान येथील भुयारी मार्गाने प्रवास करत गिरगावातील काळबीदेवी मेट्रो स्थानकापर्यंतच्या भूयारी मार्गाची पहाणी केली. मेट्रो कारशेडच्या जागेला स्थगिती दिल्यामुळे अन्य पर्यायी जागे संदर्भात काम सुरू असून स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पात लक्ष घालत असल्याची माहीती एकनाथ शिंदे यांनी दिलीय. 

महत्त्वाची बातमी :  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये झालेत 'हे' बदल..

हेही वाचा :  साड्या, पडदे आणि बेडशीट खरेदीवर कांदे फ्री फ्री फ्री...

मेट्रो ३ प्रकल्पाची वैशिष्ट

मुंबई मेट्रो 3 प्रकल्पात एकूण 33 किमीचा भूयारी मार्ग आहे. यामध्ये एकूण 27 स्थानकं आहेत. या प्रकल्पाला एकूण 23 हजार 126 कोटी रुपये आहे. Metro 3 प्रकल्पाचं आतापर्यंत 51 टक्के काम पूर्ण झालंय. एकूण 17 कटर मशिनच्या सहाय्याने भूयारांचं खोदकाम सुरू आहे. भूयाराचे एकूण 72 टक्के काम पूर्ण झालंय.  मेट्रो 3 चा पहिला आरे ते बीकेसीचा टप्पा डिसेंबर 2021 पर्यंत सुरू  हिणार आहे. मेट्रो 3 चा दूसरा टप्पा बीकेसी ते कफ परेड हा मार्ग जून 2022 पर्यंत सुरू होणार.

WebTitle : minister eknath shinde visited Metro3 CSMT station and took information about ongoing work

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister eknath shinde visited Metro3 CSMT station and took information about ongoing work