खासगी रुग्णालयांना आरोग्य योजनेत आणणार!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आश्वासन.

मुंबई : ग्रामपंचायत, नगरपंचायत स्तरावरील खासगी रुग्णालये केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत आणि महात्मा गांधी जीवनदायी योजना यांच्या अंतर्गत आल्यास ग्रामीण रुग्णांचे प्रश्‍न सुटू शकतात. त्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असून, आरोग्याच्या या सर्व सुविधा ग्रामीण भागातील रुग्णालयांतही उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध  आहोत, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. 

शहापूर येथे डॉ. प्रवीण कांगने यांच्या रुग्णालयाच्या उद्‌घाटननिमित्त विखे-पाटील शहापूरमध्ये आले होते.  यावेळी विखे-पाटील यांनी वरील आश्‍वासन दिले. या वेळी आमदार पांडुरंग बरोरा, आमदार रूपेश म्हात्रे, शहापूरचे तहसीलदार रवींद्र बाविस्कर, लाईफ लाईन रुग्णालयाचे मालक प्रवीण सूर्यराव, आदिवासी विकास प्रकल्प समितीचे अध्यक्ष अशोक इरणक, शरद गंभीरराव, दिलीप अधिकारी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Radhakrishna Vikhe-Patil assurance about rural private hospitals