अभिव्यक्तीसाठी सोशल मीडिया पूरक : विनोद तावडे

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

मुंबई : सोशल मीडिया म्हणजे करमणूक, वेळ घालविण्याचे साधन नव्हे; तर या माध्यमामुळे चांगली मूल्यनिर्मिती, समृद्ध विचार आणि विविध विषयांची सकारात्मक चर्चा होत असल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडिया आपली अभिव्यक्ती समृद्ध करण्यासाठी पूरक असल्याचे मत मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील डिजिटल मीडियाप्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पहिले मराठी सोशल मीडिया संमेलन आयोजित करण्यात आले होते, या वेळी ते बोलत होते.

तावडे म्हणाले, की माहिती आणि ज्ञानाचे विकेंद्रीकरण करण्यात या माध्यमाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोशल मीडियामुळे आज जागतिक स्तरावरील मराठी जन एकत्र बांधला गेला असून मराठीशी असलेली नाळ अधिक घट्ट झाली आहे. येणाऱ्या काळात मराठी भाषा विभागामार्फत प्रचलित साहित्यिक आणि सोशल मीडियावर लिहिणाऱ्या साहित्यिकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पहिल्या सोशल मीडिया संमेलनासाठी राज्य शासन पाठिशी असून येणाऱ्या काळात हे माध्यम अधिक शक्तिशाली करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील.
यावेळी विनोद तावडे यांनी सोशल मीडिया जबाबदारीने वापरण्याचे आवाहनही तरुणाईला केले. मुक्तपणे व्यक्त होण्यासाठी तरुणाईला हे मोठे साधन मिळाले असले, तरी त्याचा काळजीपुर्वक वापर करणे आवश्‍यक असल्याचे ते म्हणाले. 

आजची तरुणाई या माध्यमाला आपलेसे करून या माध्यमात अधिक उत्तमपणे व्यक्त होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे महापुराच्या बातम्या. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांनी दाखविल्या; पण सोशल मीडियावर तर विविध मजकूर, बातम्या यांचा महापूर पाहायला मिळाला.
- विनोद तावडे, मराठी भाषामंत्री

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: minister vinod tawde talks about social media