Big News - परवानगी दिली ! विविध राज्यांमध्ये अडकलेल्यांसाठी सरकार सोडणार विशेष ट्रेन..

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.

मुंबई - लॉक डाऊन मुळे देशातील अनेक कामगार, पर्यटक, भाविक, विद्यार्थी देशातील विविध इतर राज्यांमध्ये अडकून पडलेत. अशात परराज्यात अडकलेल्या अशांसाठी सर्वांसाठी रस्ते मार्गाने प्रवास करण्याची सशर्त परवानगी केंद्राने दिली आहे. अशातच आता केंद्राकडून अशा सर्वांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आलाय.

अडकून पडलेल्या अशा सर्वांसाठी विशेष ट्रेन सोडण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे ANI या वृत्तसंस्थेने ट्विटरवरून याबाबत माहिती दिलीये. त्यामुळे विविध राज्यांमध्ये लॉक डाऊनमध्ये अडकून पडलेल्यांना आणखी एक दिलासा सरकारकडून देण्यात आलाय.

३ मे नंतर काय ? मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह मधून सांगितलं 'असं' काही...

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत ही ट्रेन सेवा सुरु करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारांमध्ये समनव्य राहावा यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे.

२ मे पासून रुग्णालयांना लागू होणार 'हे' नवीन नियम, सरकारने घेतलेत 'मोठे' निर्णय...

एका अफवेमुळे मुंबईतील वांद्रेमध्ये अनेक कामगार जमल्याने सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी झालेली. या धर्तीवर पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून आणि प्रवासादरम्यान आणि स्थानकांवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन केलं जाणार आहे. दरम्यान या विशेष ट्रेनच्या तिकिटांची विक्री कधी आणि कशी होईल याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच माहिती देण्यात येणार आहे.

केंद्राच्या या नव्या आणि मोठ्या निर्णयामुळे अनेकांना दिलासा मिळणार आहे.

Ministry of Home Affairs allows the movement of people stranded at different places by special trains


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ministry of Home Affairs allows the movement of people stranded at different places by special trains