Ministry of Mumbai's Magic : कल्पकतेतून साकारली मुंबई नगरीची 'जादुई सफर', आता गरज हिट ऍक्शन प्लॅनची

तंत्र, सामाजिक, निर्मितीक्षम, बहुआयामी आणि गुंतवणूक अशा पाच तत्त्वांवर ‘मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक’ संस्था तरुणाईला एकत्र घेऊन मुंबईचे पर्यावरण आणि जैवविविधतेसारख्या विषयावर काम करत आहे.
Ministry of Mumbai's Magic
Ministry of Mumbai's Magicsakal

गायत्री श्रीगोंदेकर, मुंबई

Ministry of Mumbai's Magic - ‘तरुणाईची ताकद एकत्र आल्यास सरकारी यंत्रणांपलीकडे जात अभूतपूर्व सकारात्मक बदल घडतात. मुंबईकर असणे म्हणजे तुमची सर्जनशीलता, आवड आणि आवाज वापरून सुंदर अन् राहण्यायोग्य शहर घडवू या’ अशा विश्वासाने ‘मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक’ संस्था जादुई मुंबईची अनुभूती घडवून आणण्यासाठी कार्यरत आहे. मुंबईतील निसर्ग, जैवविविधता आणि संस्कृतीचे वेगळेपण नजाकतीने टिपत कलात्मक स्वरूपात शहराचे परिपूर्ण चित्र साकारत आहे...

Ministry of Mumbai's Magic
Gov. Company Shares : या सरकारी कंपनीने 9 महिन्यात गुंतवणुकदारांची संपत्ती चार पट वाढवली

तंत्र, सामाजिक, निर्मितीक्षम, बहुआयामी आणि गुंतवणूक अशा पाच तत्त्वांवर ‘मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक’ संस्था तरुणाईला एकत्र घेऊन मुंबईचे पर्यावरण आणि जैवविविधतेसारख्या विषयावर काम करत आहे. २०२० मध्ये मुंबईतील तरुणांनी एकत्रित येत संस्थेची स्थापना केली.

मुंबईतील हवामान बदल, किनारपट्टी अन् खारफुटीचे संरक्षण, जैवविविधतेचे रक्षण आणि मुंबईची मूळ सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी संस्था कार्यरत आहे.

तरुणाईला आकर्षित करणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, अभिव्यक्त करणारी माध्यमे आणि संगीत, चित्रकला, विविध प्रकाशने इत्यादींसारख्या माध्यमातून संस्था तरुणाईला विविध विषयांवर व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देते.

संकेतस्थळाच्या माध्यमातून मुंबईतील पर्यावरण आणि संबंधित सर्व विषयांवर तरुणांनीही आपले संकल्प अन् विचार मांडले आहेत. स्पोकन फेस्टिवल, जैवविविधता लेखाजोखा, कोळी समाजाच्या नरजेतून मुंबई, मरीन लाईन पॉडकास्ट, मुंबईचा जैवविविधता नकाशा,

मुंबईतील कांदळवनांचे कलात्मक चित्रण इत्यादी माध्यमातून जैवविविधता विषयावर काम केले जाते. कांदळवनांचे महत्त्व आणि संरक्षणासारख्या विषयावर जनजागृतीपर अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात.

‘क्लायमेट व्हॉईस’ उपक्रमांतर्गत मुंबईतील खाडी आणि नद्यांचे संरक्षण या विषयावर तरुणांकडून वेगवेगळ्या कल्पना मागवल्या जातात. विविध उपक्रम राबवून त्याद्वारे मुंबईतील खाड्यांच्या संरक्षणासारख्या विषयावर जनजागृती केली जाते.

मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व पटवून देताना बेस्ट उपक्रम आणि भविष्यातील सार्वजनिक वाहतूक सेवांच्या शाश्वत विकासावर तरुणाईच्या संकल्पना व विचार मांडण्यासाठीचे व्यासपीठही ‘मॅजिक’ने उपलब्ध करून दिले आहे.

संस्थेमार्फत सहलींचे आयोजनही करण्यात आले होते. त्याचबरोबर धोरणात्मक क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार करण्यासाठीही संकल्पना मांडण्यासाठीचे व्यासपीठ संस्थेने उपलब्ध करून दिले आहे.

बायोडायव्हर्सिटी बे फेस्टिवल, मुंबईतील हरित क्षेत्राच्या आठवणी आणि आपली उद्याने हरवत आहेत का? यांसारख्या उपक्रमांतून संस्था मुंबईकरांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देते. अशा उपक्रमांतून मुंबईकरांना शहरातील पर्यावरण आणि जैवविविधता राखण्यासाठी संघटित राहण्याचे आवाहनही करते.

Ministry of Mumbai's Magic
Gov. Company Shares : या सरकारी कंपनीने 9 महिन्यात गुंतवणुकदारांची संपत्ती चार पट वाढवली

हिट ॲक्शन प्लॅनची गरज!

नुकतेच संस्थेने ‘इकोज ऑफ अर्थ’ उपक्रमांर्तगत ‘मुंबईतील जैवविविधता’ विषयावर चर्चासत्रे आणि कला प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्याला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महिनाभरातील मुंबईतील वाढते तापमान पाहता शहराला हिट ॲक्शन प्लॅनची आवश्यकता भासते का? हे जाणून घेण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.

हिट अॅक्शन प्लॅनची ​​गरज लक्षात घेऊन संभाषणात सहभागी होण्याचे आणि त्यात कोणते उपाय समाविष्ट केले जावेत याबाबत कल्पना आणि सूचना देण्याचे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Ministry of Mumbai's Magic
Pune Corporation : पालिकेला टॅक्स हवाय! मग आधी द्या या सुविधा!

२०२० मध्ये कामाला सुरुवात केल्यापासून तरुणांनी मुंबईच्या पर्यावरण संवर्धनाचा भाग बनणे आवश्यक असावे, असे आम्हाला आवर्जून वाटते. तरुणांमधील सर्जनशीलता, विचारक्षमता आणि संवेदनशीलता आजच्या वातावरणीय संकटाचा सामना करण्यासाठी आवश्यक आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अधिकाधिक तरुणांना मुंबईतील हवामान बदलासाठी आणि पर्यावरण संवर्धन करणाऱ्या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे.

- व्हिन्सी अब्राहम, प्रकल्प प्रमुख, मिनिस्ट्री ऑफ मुंबईज मॅजिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com