खडवलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

दुपारी ४ वाजताच्या सुमारास शिकवणीला गेली असताना, तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन एका १५ वर्षीय मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

टिटवाळा : कल्याण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खडवली गावातील एका चाळीतील घरामध्ये सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या प्रकरणातील १५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयातही हजर करण्यात आले. कल्याण तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खडवली गावातील चाळीमध्ये राहणारी एक अल्पवयीन मुलगी सोमवारी (ता. २१) दुपारी ४ वाजताच्या सुमारास शिकवणीला गेली असताना, तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन एका १५ वर्षीय मुलाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पीडित मुलीच्या आईने कल्याण तालुका पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर सदर अल्पवयीन आरोपीवर  भादविसं कलम ३७६ (अ ब) सह, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A minor girl raped