सिनेेेमाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दिनेश गोगी
रविवार, 12 ऑगस्ट 2018

सिनेमा मध्ये हिरोईनचा रोल देतो असे आमिष दाखवून उल्हासनगरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आणि तिला मालाड मध्ये कोंबून तिच्यावर आठ महिने एका भामट्या निर्मात्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पोलिसांनी या भामट्याच्या तावडीतून मुलीची सुटका करून त्याला अटक केली आहे.

उल्हासनगर- सिनेमा मध्ये हिरोईनचा रोल देतो असे आमिष दाखवून उल्हासनगरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आणि तिला मालाड मध्ये कोंबून तिच्यावर आठ महिने एका भामट्या निर्मात्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पोलिसांनी या भामट्याच्या तावडीतून मुलीची सुटका करून त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ महिन्यांपूर्वी मालाड परिसरात राहणाऱ्या मेहबुबअलि खान(39) याने त्याचे विविध हिरो, हिरोईनबरोबर असलेल्या फोटोचा एक वाट्सअप ग्रुप तयार केला. त्यात काही मुलींना त्याने अ‍ॅड केले. त्यात उल्हासनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचाही समावेश होता. मेहबुबअलि याने त्या मुलीशी संपर्क साधून तिला सिनेमामध्ये हिरोईनचा रोल देतो आपण निर्माता व दिग्दर्शक आहे असे अमिष दाखवले. जवळीक साधली आणि तिच्यावर त्याने डिसेंबर 2017 ते जुलै 2018 पर्यंतच्या कालावधीत वेगवेगळया ठिकाणी नेऊ अत्याचार केला.

अल्पवयीन मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार प्रथम उल्हासनगर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर त्या मुलीचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्यावर पोलिसांनी त्या गुन्हयाचा तपास जोमाने सुरू केला. स्वता:ला निर्माता व दिग्दर्शक समजणाऱ्या मेहबुबअलि खान याने त्या मुलीला मालाड येथे ठेवले. असल्याची माहिती उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पालवे यांना मिळाली. त्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, हवालदार बागुल, वाघ, महिला पोलीस मालती कांबळे यांनी मालाड परिसरात मेहबुबअलि खान याला ताब्यात घेऊन त्याच्या तावडीतून त्या अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे.

याप्रकरणी, मेहबुबअलि याच्याविरूध्द उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हाजर केले असता 16 आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशी व तपासात मेहबुबअलि हा कोणताच निर्माता व दिग्दर्शक नसून तो व्यवसायाने एक टेलर असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. सिनेमात हिरोईनचा रोल देतो असे सांगून त्याने आणखीन किती तरूणींना अमिष दाखवून फसवले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी करीत आहेत.

Web Title: Minor girl tortured by showing bait for cinema