कस्तुरबात नाही आता टेंभा येथील रुग्णालयात होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार

File Photo
File Photo

भाईंदर : भाईंदर पश्‍चिम भागातील टेंभा येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालय आता कोविड- १९ रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रुग्णालयात आता केवळ कोरोनाबाधितांवरच उपचार करण्यात येणार आहेत. बुधवारपासून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अन्य रुग्णांना आता महापालिकेच्या मिरा रोड येथील रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयांत पाठवण्यात येत आहे.

आतापर्यंत कोरोनाची लक्षणे आढळलेल्यांना मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात येत होते; मात्र आता कोरोनाच्या संशयित रुग्णांचे नमुने घेणे, कोरोनाग्रस्तांवर उपचार करणे, त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवणे आदी सोपस्कार टेंभा येथील रुग्णालयातच पार पडणार आहेत. 
रुग्णालयात कोरोना उपचारासाठी १०० खाटा सज्ज करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात सहा व्हेंटिलेटर यंत्रे आणि अतिदक्षता कक्ष तयार करण्यात आले आहेत.

Mira-Bhayander Municipal Corporation decision

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com