मिस कॉल करा अन्‌ कौल द्या

रश्‍मी पाटील - सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

ठाणे - ठाणे पालिका निवडणुकीच्या प्रचारात यंदा वेगळे रंग पाहायला मिळत आहेत. अनेक नव्या, तरुण उमेदवारांचे प्रचार फंडेदेखील नवोदित आणि हटके आहेत. या प्रचाराच्या नवनवीन युक्‍त्यांपर्यंत ठीक होते; मात्र काही उतावळ्या उमेदवारांना मतदान आणि निकालापूर्वीच निर्णयाची उत्सुकता लागली आहे. मतदारांचा कौल काय असेल हे जाणून घेण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन पाठिंबा दर्शवण्याचे आवाहनच काही उमेदवारांनी केले आहे.

मतदारांच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्‌सॲपवर मेसेज करून उमेदवार सातत्याने आपली ओळख करून देत आहेत. यात उमेदवाराचे नाव, प्रभाग क्रमांक याबरोबरच एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे. त्या क्रमांकावर मिस कॉल देऊन पाठिंबा देण्याचे आवाहन करणारे मेसेज सध्या फिरत आहेत. निवडणुकीला उभे राहिलेल्या या  उमेदवारांनी निवडणूक जिंकणारच, अशी तयारी केलेली आहे. यातल्याच काही उमेदवारांनी प्रचारासाठी स्वतःचे ॲप तयार केले असून, ते सर्वत्र प्रसारित करत आहेत. हे ॲप इतके परिपूर्ण आहेत की, निवडून आल्यावर नगरसेवक म्हणून प्रभागात काम करण्यासाठी त्याचा उत्तम वापर करता येऊ शकतो. नगरसेवक झाल्याप्रमाणे जय्यत तयारी केलेल्या अशाच काही उतावळ्या उमेदवारांनी प्रचाराच्या लगीनघाईमध्ये आपल्याकडून मतमोजणी करण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Missed call and let Kaul