esakal | उल्हासनगरात मिशन 2022 निवडणुकीची मोर्चेबांधणी
sakal

बोलून बातमी शोधा

उल्हासनगरात मिशन 2022 निवडणुकीची मोर्चेबांधणी

उल्हासनगरात मिशन 2022 निवडणुकीची मोर्चेबांधणी

sakal_logo
By
दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर: काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या उल्हासनगर महानगरपालिका मिशन 2022 च्या निवडणुकीची मोर्चेबांधणी शिवसेना, साईपक्षाच्या भेटीमध्ये सुरू झाली आहे. पालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, टीओके, पीआरपी अशा महाविकास आघाडीची सत्ता आहे. दीड वर्षांपूर्वी महापौरांच्या निवडणुकीत टीओकेचे ओमी कालानी यांनी भाजपाला सोडून शिवसेनेला साथ दिली होती.

हेही वाचा: मुंबईत महिलेच्या अवयवदानामुळे तिघांना जीवदान

तेंव्हा साईपक्षाला भाजपात विलीन करणारे जीवन ईदनानी यांचा पराभव झाला होता. आणि शिवसेनेच्या लिलाबाई आशा निवडून आल्या होत्या. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीत साई पक्षाचे जीवन ईदनानी यांनी भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीची साथ दिली होती. आज खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन ईदनानी यांची त्यांच्या कार्यालयात भेट दिल्याने आणि त्यांच्या वार्डात विकासकामांची पाहणी केल्याने शिवसेना साईपक्ष यांचे राजकीय नाते घट्ट झाले आहे.

ईदनानी महाविकास आघाडी सोबत असणार असून, सबका साथ सबका विकास असे सुतोवाच डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. भाजपाच्या चिन्हावर निवडून आलेले टीओके सोबत नाही आणि आता भाजपात विलीन झाल्यावरही साईपक्षाने देखील महाविकास आघाडीकडे कल दिल्याने 2022 च्या निवडणुकीत भाजपा कोणती खेळी खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

1996 साली उल्हासनगर नगरपरिषदचे महानगरपालिकेत रूपांतर झाले. 2007 मध्ये साई बलराम, जीवन ईदनानी यांनी गंगाजल फ्रंटची स्थापना केली. त्यानंतर फ्रंटचे साई पक्षात अर्थात सेक्युलर अलायन्स ऑफ इंडिया असे नामकरण झाले. मास्टर माईंड, किंगमेकर समजले जाणारे जीवन ईदनानी हे 2007 पासून सतत सत्तेत आहेत. त्यांच्या पक्षाने महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती ही महत्त्वाची पदे मिळवलेली आहेत.

हेही वाचा: 'मुंबई महापालिकेत कोस्टल रोडच्या नावे १ हजार कोटींचा घोटाळा'

2017 च्या निवडणुकीत भाजपा, साईपक्ष, टीओके सत्तेत आले. जीवन ईदनानी यांना उपमहापौर मिळाले. दीड वर्षांपूर्वी ईदनानी हे महापौरांच्या निवडणुकीसाठी उभे राहिले. त्यांनी साईपक्षाला भाजपात विलीन केले. भाजपा, टीओके सोबत असल्याने ईदनानी यांचा विजय निश्चितच होता. मात्र आमदारकीचे तिकीट नाकारल्याने टीओकेचे ओमी कालानी यांनी महापौरांच्या निवडणुकीत शिवसेनेला साथ दिली.

आणि प्रथमच मास्टर माईंड, किंगमेकर समजले जाणारे जीवन ईदनानी यांची खेळी फसली. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या प्रभाग समिती सभापतींच्या निवडणुकीत जीवन ईदनानी यांनी भाजपाला सोडून शिवसेना, टीओके सोबत कमबॅक केले. दिप्ती दुधानी सभापती झाल्या.

पण हे कमबॅक क्षणिक नसून कायम असल्याचे प्रमाण जीवन ईदनानी यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीत दिले आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक कलवंतसिंग सोहता, गटनेते गजानन शेळके, रमेश चैनानी आदी उपस्थित होते.

"खासदारांचा बेडमिंटनचा मोह झाला अनावर"

बैठक संपन्न झाल्यावर खासदार डॉ.शिंदे हे ईदनानी यांच्यासोबत दुरावस्थेत असलेल्या इंदिरा गांधी गार्डनची पाहणी करण्यासाठी गेले असता, काही तरुण बॅडमिंटन खेळत होते. पावसाळ्यात बॅडमिंटन कोर्टवर ओलावा असतानाही डॉ.श्रीकांत शिंदे यांचा बॅडमिंटन खेळण्याचा मोह अनावर झाला आणि त्यांनी काही मिनिटे तरुणां सोबत बॅडमिंटनचा आनंद लुटला.

loading image
go to top