मकरंद अनासपुरे यांच्या फोटोंचा सोशल मीडियावर गैरवापर; अज्ञातांवर गुन्हा

मकरंद अनासपुरे यांच्या फोटोंचा सोशल मीडियावर गैरवापर; अज्ञातांवर गुन्हा

ठाणे : सुप्रसिद्ध सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या छायाचित्रांचा वापर करून सोशल मीडियात राजकीय, सामाजिक गैरसमज पसरवणारे मजकूर प्रसारित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात अनासपुरे यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठाण्यात राहणारे मकरंद अनासपुरे यांच्या बहुतांश भूमिका विनोदी आणि लोकप्रिय असल्याने त्यांचे अनेक चाहते आहेत. चाहत्यांकडूनही त्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे विविध मजकूर पाठविण्यात येतो. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या विनोदी मजकुराच्या छायाचित्रामध्ये छेडछाड करून सोशल मीडियात प्रसारित केल्या जात आहेत. मात्र, या मजकूरांशी काहीच संबंध नसल्यामुळे तसेच विनोदी मजकूर असल्यामुळे अनासपुरे यांनी त्याकडे गांर्भीयपूर्वक पाहिले नव्हते. परंतु, मार्च ते जुलै 2019 या कालावधीत राजकीय स्वरुपाचा तसेच समाजामध्ये अनासपुरे यांच्याबद्दल गैरसमज आणि तिरस्कार निर्माण करणारा असल्याची बाब अनासपुरे यांच्या निर्दशानास आली.

त्यामध्ये ‘वाजले की बारा’ या फेसबुक ब्लॉगवर ए जे क्रिएशन अ‍ॅपवर एक आणि अन्य एक असे आक्षेपार्ह मजकूर दिसून आले. तेव्हा यासंदर्भात अनासपुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कासारवडवली पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, दुष्काळग्रस्त व पाणी टंचाई असलेल्या भागात सामाजिक काम करत असल्याने माझा कोणत्याही राजकीय पक्ष आणि संघटनेशी संबंध नाही. तेव्हा हे मजकूर राजकीय स्वरुपाचे तसेच आपल्याबद्दल गैरसमज आणि तिरस्कार निर्माण करून बदनामी करणारे असल्याचेही अनासपुरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

राजकीय मजकूर व्हायरल

अनासपुरे यांचा विनोदी भुमिकेतील छायाचित्राचा वापर करून राजकीय मजकूर प्रसारित करण्यात आला आहे. त्यामध्ये दोन मुस्लीम महिलांचे छायाचित्र, कमळाचे चिन्ह आणि अनासपुरे यांचे छायाचित्र वापरले असून त्यावर ‘ट्रिपल तलाक देवू नका, जेलमध्ये जाल...बायकोला असंच सोडून द्या, पंतप्रधान बनाल’ असा मजकूर आहे.

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अनासपुरे यांचे छायाचित्र, कमळ चिन्ह वापरून प्रसारित केलेल्या मजकुरात, दानवे यांच्या तोंडी ‘मला मतदान दिल तरच मोदी पुन्हा पंतप्रधान होतील’ तर अनासपुरे यांच्या तोंडी ‘बर झाल सांगितले...आम्ही दोघांनाही वैतागलोय...’असा उल्लेख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com