Mumbai Rains : मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने क्रांती नगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे पालिकेने इथल्या राहिवाश्यांना जवळच्या बजारवाड पालिका शाळेत स्थलांतरीत केले आहे.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कुर्ला पश्चिम मधील मिठी नदीजवळ असलेल्या क्रांतीनगर परिसरातील तेराशे लोकांना स्थलांतरित करण्यात आले असून जवळच्या पालिका शाळेत या राहिवाश्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेच्या आपात्कालीन पथकासह एनडीआरएफचं पथक दाखक झालं असून परीसरात बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने क्रांती नगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. यामुळे पालिकेने इथल्या राहिवाश्यांना जवळच्या बजारवाड पालिका शाळेत स्थलांतरीत केले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे तर अनेक घरं जलमय झाली आहेत. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने इथल्या राहिवाश्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून शाळा, महाविद्यालये, सामाजमंदिरणामध्ये त्यांच्या राहण्याची,खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे.

मुंबईत पावसाचा जोर कायम असून पुढे देखील मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. अश्यातच मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पालिकेसह अग्निशमन दल, पोलिस प्रशासन दाखल झाला असून नेव्हीकडून मिठी नदीत बोटीच्या माध्यमातून गस्त सुरू करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mithi river crossed flood line