Mumbai Rains : कुर्ल्यातील ४०० लोकांचे स्थलांतरण; मिठीने धोक्याची पातळी ओलांडली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने क्रांती नगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे.यामुळे पालिकेने इथल्या राहिवाश्यांना जवळच्या बजारवाड पालिका शाळेत स्थलांतरीत केले आहे.

मुंबई : कुर्ला पश्चिम मधील मिठी नदी जवळ असलेल्या क्रांति नगर परिसरातील ४०० लोकांना स्थलांतरित करण्यात आले असून जवळच्या पालिका शाळेत या राहिवाश्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने क्रांती नगरमधील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे.यामुळे पालिकेने इथल्या राहिवाश्यांना जवळच्या बजारवाड पालिका शाळेत स्थलांतरीत केले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे तर अनेक घरं जलमय झाली आहेत. यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पालिका प्रशासनाने इथल्या राहिवाश्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून शाळा, महाविद्यालये, सामाजमंदिरणामध्ये त्यांच्या राहण्याची,खाण्या-पिण्याची व्यवस्था केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mithi river flow now dnager zone in Mumbai