जपानी तंत्रज्ञानावर आधारित नवी मुंबईत "मियावकी' उद्यान

जपानी तंत्रज्ञानावर आधारित नवी मुंबईत "मियावकी' उद्यान

नवी मुंबई : मर्यादित जागेत घनदाट झाडी निर्माण करणारी जपानी तंत्रज्ञानावर आधारित असणारे मियावकी उद्यान महापालिका शहरात विकसित करणार आहे. नेरूळ येथील पाम बीच रस्त्यालगत ज्वेल ऑफ नवी मुंबईत मियावकी उद्यान निर्माण केले जाणार आहे. महापालिकेचे उद्यान विभाग त्याकरिता काही वनस्पतीतज्ज्ञांची मदत घेणार आहे. शहराला जास्तीत जास्त ऑक्‍सिजन पुरवठा करणाऱ्या झाडांची वृक्षलागवड केली जाणार आहे. 

जपानमधील वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावकी यांची ही मूळ संकल्पना आहे. यात केवळ स्थानिक प्रजातींचा वापर करून रोपांची दाट लागवड केली जाते. रोपे निवडतानाही दुर्मीळ प्रजातींना प्राधान्य देण्यात येते, ज्या मातीत प्रत प्राधान्याने खराब असते. अशा चार स्तरांमध्ये एक ते बारा महिने वयाची रोपे या पद्धतीत लावण्यात येतात. यातून विविध वृक्षांचे जंगल तयार केले जाते. मृदा सर्वेक्षण, प्रजातींची निवड आणि वर्गीकरण, बायोमास सर्वेक्षण, वृक्षारोपण आणि देखभाल असे विविध टप्पे मियावकी पद्धतीत पार पाडावे लागतात. कोंडा, शेणखत, तणस, जीवामृत, बांबू काठ्या, गूळ, शेण आदींचा रोपांच्या लागवडीसाठी वापर केला जातो. नेरूळ येथील ज्वेल्स ऑफ नवी मुंबईतील काही मोकळ्या जागेवर मियावकी पद्धतीने वृक्षारोपण करून घनदाट जंगल तयार केले जाणार आहे. वृक्षलागवड केल्यानंतर दहा वर्षांनी दाट झाडी उगवण्यास सुरुवात होते. एका एकराच्या जागेत सुमारे 12 हजार झाडे विकसित केली जाऊ शकतात. नवी मुंबईत हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर प्रदूषण रोखण्यासाठी इतर नोडमध्येही संकल्पना राबवली जाणार आहे. 

आनंदवनात मियावकी बहरली 
राज्यात मियावकी तंत्रज्ञानावर घनदाट वृक्षलागवड करण्याचा यशस्वी प्रयोग प्रसिद्ध समाजसेवक बाबा आमटे यांच्या आनंदवनात करण्यात आला आहे. हा उपक्रम श्रमसंस्कार छावणी शिबिरात राबवण्यात आला. यात देशभरातून पाचशे तरुण-तरुणींनी सहभागी होऊन वृक्षारोपण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com