Sanjay Raut : संजय राऊत कोणी ज्योतिष नाहीत; गणपत गायकवाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Ganpat Gaikwad statement Sanjay Raut is not an astrologer politics mumbai

Sanjay Raut : संजय राऊत कोणी ज्योतिष नाहीत; गणपत गायकवाड

डोंबिवली - राज्यातील शिंदे फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यावर ते कोणी महर्षी किंवा ज्योतिषी नाहीत असा टोला भाजपाचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी राऊत यांना लगावला आहे. राऊत जे काही बोलतात त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असेही आमदार गायकवाड म्हणाले. कल्याण पूर्वेतील रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आमदार गायकवाड आले होते. यावेळी त्यांनी वरील टोला राऊत यांना लगावला. येत्या दोन महिन्यांत राज्यातील शिंदे-फडणवीस फडणवीस सरकार कोसळणार असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

इतकंच नाही तर सरकार पडणार असल्याची माझ्याकडे पूर्ण माहिती असून मला याची खात्री देखील असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांच्या या विधानामुळे येत्या दोन महिन्यांत राज्यातील राजकारणात कोणता भूकंप येणार? अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. यावर कल्याण पूर्वचे आमदार गायकवाड म्हणाले, संजय राऊत हे कोणी महर्षी किंवा ज्योतिषी नाहीत. ते जे काही बोलतात त्याकडे जनतेने लक्ष देण्याची गरज नाही. सध्या शिंदे सरकारकडून जोरदार काम सुरू आहे. हे सरकार पूर्ण काळ टिकेल आणि पुढचे 5 वर्ष पण टिकेल असा दावा त्यांनी यावेळी केला.