विदर्भाला मिळणार न्याय; आमदार गोपीकिशन बाजोरियांना संधी?

मिलिंद तांबे
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

मुंबई  : शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीने राज्यात सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलंय. आता सर्वांचं लक्ष मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला त्याचप्रमाणे मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या वाट्याला 16 मंत्रिपदं येणार असून त्यांचा विदर्भाला न्याय देण्याचा प्रयत्न असून शिवसेनेचे विधानपरिषदेवरील विदर्भातील आमदार गोपिकीशन बाजोरिया यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.

आमदार गोपीकिशन बाजोरिया हे अकोला वाशिम बुलडाणा येथून स्थानिक स्वराज्य संस्था चे सतत तीन वेळा प्रतिनिधित्व करत आहेत. शिवसेनेला पुरेसे संख्याबळ नसताना तेथून निवडून येतात. विशेष म्हणजे स्वताच्या मुलाला मराठवाड्या मधील परभणी हिंगोली येथून स्थानिक स्वराज्य संस्था येथून निवडून आणण्याची जादू बाजोरिया यांनी केलि आहे. स्वता एल एल एम असलेल्या बाजोरिया यांचा महसूल आणि नगर विकास या खात्याचा दांडगा अभ्यास आहे.

विदर्भात सध्या सेनेचे केवळ मर्यादित आमदार असून तेथे सेनेला अधिक ताकद मिळेल असा पक्ष्याचा मानस आहे.सद्या अकोल्यात आमदार गोपिकीशन बाजोरीया यांच्या रूपाने प्रभावी पर्याय उपलब्ध असून गेली तीन टर्म  तीन जिल्ह्याचे विधान परिषदेत सेनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बाजोरिया यांनी मराठवाड्यात सुद्धा मुसंडी मारून हिंगोली -परभणी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात भगवा फडकवला आहे.सेनेने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास सेनेला अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून त्यांच्या रूपाने अभ्यासू चेहरा मिळणार आहे. संघटन वाढीसाठी त्यांचा चांगला उपयोग होईल.भविष्यात त्यांचा मोठा लाभ पक्षाला होईल यात शंका नाही. अभ्यासू, उच्च विद्याविभूषित, शांत आणि संयमी स्वभाव आणि पक्षासोबतची निष्ठा त्यांना यावेळी निश्चित कामी येणार असल्याचे बोलले जात आहे.

Webtitle : MLA gopikishan bajoria may get chance in cabinet of uddhav thackeray 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA gopikishan bajoria may get chance in cabinet of uddhav thackeray