'आमदार राठोडांना पुन्हा नोटीस धाडणार'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

मुंबई - भटक्‍या विमुक्त जमातींच्या कल्याणासाठी रेणके आयोगाने केलेल्या शिफारशींसाठी धरणे धरून जागृती यात्रा काढणारे आमदार हरिभाऊ राठोड आयोगाची निंदा करत असून, देवी कमिटीचा अहवाल दडपल्याचा आरोप धादांत खोटा आहे, असे सांगत राठोडांना दुसऱ्यांना अब्रूनुकसानीची नोटीस धाडणार असल्याची माहिती भटक्‍या विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी केला आहे.

भारतातील 750 जाती आणि 1620 उपजातींच्या सुमारे 13 कोटी भटक्‍या विमुक्तांना सामूहिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी आयोग नेमला गेला; मात्र शिफारशींची सरकारने अंमलबजावणी केली नाही. राज्यघटनेतील कलम 342 च्या दुरुस्तीची मागणीही प्रलंबित असल्याचे रेणके यांनी सांगितले. आमदार हरिभाऊ राठोड हे सध्या प्रसारमाध्यमांतून आणि जाहीर कार्यक्रमांतून रेणके आयोगावर टीका करत आहेत. हा धादांत खोटेपणा असून, कधीकाळी रेणके आयोगाच्या शिफारशीसाठी राठोडांनी केलेल्या आंदोलनाचे दाखलेही त्यांनी या वेळी दिले. गणेश देवी समितीचा अहवाल दडपला, हा आरोपही त्यांनी फेटाळला आहे. यापूर्वी त्यांच्या खोटेपणाविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला असून, आता दुसऱ्यांदाही त्यांना नोटीस पाठवणार असल्याचे बाळकृष्ण रेणकेंनी सांगितले.

Web Title: mla haribhau rathod notice