भाईंदर मेट्रोची सुनावणी स्थगित; प्रताप सरनाईकांनी अधिवेशनात मांडली लक्षवेधी

Metro
MetroSakal Digital

भाईंदर : भाईंदर मेट्रोसंदर्भात (Bhayandar Metro) ग्रामस्थांच्या हरकतींवर ठाणे जिल्हाधिकारी (Thane collector) कार्यालयाने सोमवारी आयोजित केलेली सुनावणी स्थगित केली. मेट्रो मार्गिका आणि कारशेडविरोधात (Metro carshed) ग्रामस्थांच्या आंदोलनासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनात (budget session) लक्षवेधी सूचना मांडली आहे. या सूचनेवर सरकारची भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत सुनावणीला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी सरनाईक यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार ही स्थगिती देण्यात आली आहे.

Metro
मुंबई : आरे कारशेड हस्तांतरणाचं काय झालं ? पर्यावरणप्रेमींमध्ये संभ्रम

भाईंदरच्या पुढे विस्तार करण्यात येणाऱ्या मेट्रो मार्गिका आणि त्याच्या नियोजित कारशेडसाठी भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. एक हजाराहून अधिक हरकती जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवल्या होत्या. या हरकतींवर जिल्हाधिकारी कार्यालयात १४ ते १६ मार्चदरम्यान सुनावणी ठेवण्यात आली होती; मात्र स्थानिकांच्या मेट्रोच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आमदार सरनाईक यांनी विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित केली आहे. दुसरीकडे ही सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात न घेता मिरा-भाईंदरमध्ये घेण्यात यावी, असा आग्रह शेतकऱ्यांनी घेतला होता.

शेतकऱ्यांची उपस्थिती

सुनावणीला स्थगिती दिल्याचे पत्र स्थानिक तलाठी कार्यालयाला ११ मार्चला देण्यात आले होते, परंतु तलाठी कार्यालयाने त्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलीच नाही. परिणामी शेतकरी सोमवारी सुनावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले होते, अशी माहिती भूमिपुत्र सामाजिक समन्वय संघटनेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com