VIDEO | 'रवी राणा का शपथ लेनेका स्टाईल थोडा अलग है रे बाबा', एकदा पाहा तर..

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

आपल्या राजकारण्यांवर सोशल मिडिया नावाचा एक मोठा कॅमेरा फिट झालाय. सभागृहात काय होतं हे आपल्याला थेट पाहायला तर मिळतंच. कुणी झोपलं, कुणी पोर्न पाहिलं तर त्यावरही नेटकरी कायम व्यक्त होताना पाहायला मिळतात.  याचीच अनुभूती या एका व्हिडीओतून येताना मिळतेय.

आपल्या राजकारण्यांवर सोशल मिडिया नावाचा एक मोठा कॅमेरा फिट झालाय. सभागृहात काय होतं हे आपल्याला थेट पाहायला तर मिळतंच. कुणी झोपलं, कुणी पोर्न पाहिलं तर त्यावरही नेटकरी कायम व्यक्त होताना पाहायला मिळतात. याचीच अनुभूती या एका व्हिडीओतून येताना मिळतेय.

नक्की झालंय काय? हे सांगण्याआधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. त्याचं असं की, सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता लवकरात लवकर आमदारांना आपल्या सदस्यत्त्वाची शपथ द्या आणि लगेच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिलेत.

अत्यंत महत्त्वाची बातमी | येत्या मंगळवारी होणार शेतकरी कर्जमाफीची सर्वात मोठी घोषणा ?
 

यानंतर अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला, लगेच फडणवीसांनी समोर येत आमच्याकडे बहुमताचा आकडा नाही सांगत आपल्या पदाचा देखील राजीनामा दिला. पुढे आमदारांच्या शपथविधीचा दिवस उजाडला, जेष्ठतेनुसार एकामागोमाग एक आमदारांनी शपथ देखील घेतली. मात्र यातील एक शपथ, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होतोय आणि नेटकरी त्याची खिल्ली उडवताना पाहायला मिळतायत.   

ही व्हायरल शपथ आहे अपक्ष आमदार रवी राणा यांची. होय, हे रवी राणा अपक्ष आमदार नवनीत राणा यांचे पती. शपथ घेताना रवी राणा यांची अक्षरशः बोलती बंद झालेली पाहायला मिळतेय.  

अत्यंत महत्त्वाची बातमी | पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, या मंत्र्यांची लागणार वर्णी..

 

पहिला का व्हिडीओ.. काय वाटलं पाहून? हा व्हिडीओ पाहून नेटकरी फारसे खुश दिसत नाहीत. आणि म्हणूनच आता रवी राणा यांना फेसबुकवर ट्रोल करण्यात येतंय. हे तेच आमदार आहेत ज्यांनी छातीठोक पणे शिवसेनेच्या गोटातून राजकीय भूकंप होणार आहे असं भाकीत वर्तवलं होतं. भाजप समर्थक रवी राणा यांनी भाजपकडे 175 आमदारांचं संख्याबळ आहे असं देखील म्हटलं होतं. ते देखील खरं होताना पाहायला मिळालेलं नाही.

आता आपण निवडून दिलेल्या आमदाराला आपल्याच आमदारकीची शपथ देखील वाचता येत नसेल तर त्या मतदार संघात कितीपत विकास होईल हा प्रश्न न विचारलेला बरा, नाहीका ? तुम्हाला  हा व्हिडीओ पाहून काय वाटतंय ? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.. 

Web Title : MLA ravi rana trolled on facebook for not reading his oath properly  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA ravi rana trolled on facebook for not reading his oath properly