नवी मुंबईत राष्ट्रवादीला झटका; आमदारासह 52 नगरसेवक भाजपात जाणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठा झटका बसण्याची शक्यता असून नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक राजीनामा देवून भाजपात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

नवी मुंबई - नवी मुंबईत राष्ट्रवादीला मोठा झटका बसण्याची शक्यता असून नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक राजीनामा देवून भाजपात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

आमदार संदीप नाईक हे भाजपात जाणार असून त्यांच्यासोबत नवी मुंबई महापालिकेतील 52 नगरसेवक हे भाजपात जाणार आहेत. संदीप नाईक यांचे वडील आणि शरद पवार यांचे विश्वासू मानले जाणारे गणेश नाईकांनी न ऐकल्यास त्यांना सोडून पुत्र संदीप नाईक भाजपात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर पक्ष सोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा दबाव असून आज (ता.28) दुपारी झालेल्या बैठकीत भाजपात जाण्याबाबत नगरसेवकांनी दबाव आणला असल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईकही उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sandip Naik may Enter in BJP With 52 Corporaters