मेट्रोला आमदार सुनील शिंदे यांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 ऑक्टोबर 2016

भायखळा - प्रस्तावित मेट्रो रेल्वेच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रकल्पामुळे वरळीतील डॉ. ई मोझेस मार्गवरील गीता सिनेमागृहासमोरील अनेक घरे आणि चाळी विस्थापित होणार आहेत. या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांच्या समस्येबाबत आमदार सुनील शिंदे यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत वरळी येथे पाहणी करून चर्चा केली.

महापालिका आणि एमएमआरडीएने प्रकल्पाबाबत रहिवाशांचा कोणताही अभिप्राय घेतलेला नाही; तसेच वर्षानुवर्षे येथे राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबीयांवर होणाऱ्या अन्यायाला आमचा विरोध असेल, असे त्यांनी सांगितले. याबाबत मेट्रो प्रशासनाने मार्गात थोडा बदल करून चाळी आणि घरे विस्थापित होण्यापासून वाचवावीत आणि पर्यायी मार्ग तयार करावा, असे ते म्हणाले. प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या घरांच्या पुनर्वसनाची जबाबदारी महापालिका आणि एमएमआरडीएची असून, त्यांच्या पुनर्वसनाबाबत योग्य त्या स्वरूपातील तरतूद करून लेखी हमी दिल्याशिवाय प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Web Title: MLA Sunil Shinde's oppose for Mumbai Metro