मुंबईतील तापमानात दोन अंशांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

मुंबई - थंडीचा जोर मुंबईत कायम असला तरी येत्या दिवसांत तापमान दोन अंशांनी वाढेल. शुक्रवारी कमाल आणि किमान तापमानात दोन अंशांनी वाढ झाली. ही वाढ काही दिवस कायम राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भातील थंडीची लाट कायम राहील. परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शनिवारी पावसाच्या तुरळक सरी पडतील, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

Web Title: mmbai temperature increase