एमएमआरडीएचा 16 हजार 909 कोटींचा अर्थसंकल्प 

एमएमआरडीएचा 16 हजार 909 कोटींचा अर्थसंकल्प 

मुंबई - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) गुरुवारी झालेल्या 147 व्या बैठकीत मुख्यमंत्री, प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 16 हजार 909 कोटी 10 लाखांचा अर्थसंकल्प मंजूर केला. या अर्थसंकल्पात 10 मेट्रो प्रकल्पांसाठी सात हजार 486.50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच या अर्थसंकल्पात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांसाठीही तरतूद करण्यात आली आहे. दादर येथील इंदू मिल कंपाऊंडमध्ये उभारण्यात येणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या व दादर येथील महापौर बंगल्याच्या जागी उभारण्यात येणाऱ्या ठाकरे यांच्या स्मारकासाठी 210 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही दोन्ही स्मारके भावी पिढ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील. उज्ज्वल भविष्यासाठी मेट्रो प्रकल्प अनिर्वाय आहेत. त्याचप्रमाणे थोर नेत्यांची मार्गदर्शक तत्त्वे ध्यानात ठेवणेही आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. 

एकीकडे पायाभूत सुविधा ही काळाची गरज असतानाच महान नेत्यांची स्मारके आपल्याला इतिहासाशी जोडून ठेवतात हे विसरून चालणार नाही. भूत, वर्तमान, भविष्य आणि पर्यावरण या चार गोष्टीच आपल्याला संपूर्ण विकासाकडे घेऊन जाऊ शकतात, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

अर्थसंकल्पावर एक नजर 
प्रकल्प... तरतूद (कोटी रुपयांमध्ये) 
- मेट्रो भवन - 100 
- वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो- 1 - 98 
- दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो- 2 अ - 1, 895 
- डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो- 2 ब - 519.60 
- कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो- 3 - 650 
- वडाळा ते कासारवडवली मेट्रो- 4 - 1,337 
- ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो- 5 - 150 
- समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो- 6 - 800 
- अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो- 7 - 1,921 
- गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो- 10- 5 
- वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो- 11 - 5 
- कल्याण ते तळोजा मेट्रो- 12 - 5 
- सूर्या प्रकल्प - 700 
- विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्ग - 2,250 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब ठाकरे स्मारक - 210 
- मोनो रेलचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौकापर्यंतचा दुसरा टप्पा - 150 
- विस्तारित मुंबई पायाभूत सुविधा प्रकल्प - 800 भूसंपादनासह 
- मुंबई नागरी परिवहन प्रकल्प - 500.10 
- मुंबई महानगर प्रदेशाच्या बाह्य क्षेत्रातील रस्ते सुधारणा - 143 
- सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याचे कुर्ला ते वाकोला पुलापर्यंत विस्तारीकरण तसेच वांद्रे-कुर्ला संकुल ते पश्‍चिम द्रुतगती महामार्गापर्यंत उन्नत मार्ग - 100 
- पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्‍शन, घाटकोपर (पूर्व) येथे उन्नत मार्गाची सुधारणा - 75 
- कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या परिसरात पायाभूत सुविधा - 54 

सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com