मेट्रोचा खर्च महापालिकेने उचलावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जुलै 2019

मेट्रो प्रकल्पामुळे पालिकेलाच फायदा होणार असल्याने प्रकल्पाच्या खर्चापैकी २५ टक्के खर्च पालिकेनेही उचलावा, अशी मागणी ‘एमएमआरडीए’ने केली आहे.

मुंबई -मुंबई शहरात सध्या सुरू असलेल्या सात मेट्रो प्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडीतून सुटका होईल. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन महापालिकेचा रस्तेदुरुस्तीचा खर्च कमी होईल. मेट्रो प्रकल्पामुळे पालिकेलाच फायदा होणार असल्याने प्रकल्पाच्या खर्चापैकी २५ टक्के खर्च पालिकेनेही उचलावा, अशी मागणी ‘एमएमआरडीए’ने केली आहे.

एमएमआरडीएने दुसऱ्यांदा महापालिका आयुक्तांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. मेट्रो सुरू झाल्यावर रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन रस्तेदुरुस्ती आणि तत्सम कामांवरील खर्चात कपात होईल. याचा फायदा पालिकेला होणार असल्याने त्यांनी मेट्रोच्या खर्चातील वाटा उचलावा, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MMRDA has demanded that the Municipal Corporation should take advantage of the Metro project due to the benefit of the corporation