मुंबई : पूर्व-पश्चिम महामार्गाचे काँक्रीटीकरण होणार; MMRDA बैठकीत मंजुरी | MMRDA news update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MMRDA

मुंबई : पूर्व-पश्चिम महामार्गाचे काँक्रीटीकरण होणार; MMRDA बैठकीत मंजुरी

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : पूर्व आणि पश्चिम महामार्गावर (eastern and western highway) दरवर्षी पडणारे खड्डे आणि यामुळे होणारी वाहतूक कोंडी (traffic jam) दूर करण्यासाठी एमएमआरडीएने (mmrda) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरण (cement concrete road) करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यानुसार या कामासाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार आहेत.

हेही वाचा: ख्रिसमस, नवीन वर्षाच्या तोंडावर कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना

पूर्व आणि पश्चिम महामार्गाच्या देखभाल दुरुस्तीचे काम एमएमआरडीएमार्फत करण्यात येत आहे. या मार्गावर मेट्रो प्रकल्प राबविण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. या दोन्ही मार्गांची दुरुस्तीवर एमएमआरडीए करोडो रुपये खर्च करते. यानंतरही पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. दरवर्षी होणारा खर्च आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावरील माहीम जंक्शन ते दहिसर चेक नाका दरम्यानच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या निर्णयाला प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे.

तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील सायन जंक्शन ते गोल्डन डाईज जंक्शन, माजिवडा, ठाणे या एकूण 23.55 किमी रस्त्याच्या दोन्ही मार्गांचे काँक्रिटीकरण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच र्व द्रुतगती महामार्गावरील आनंद नगर ते साकेत (6.30 किमी) दरम्यान उन्नत रस्ता बांधण्यासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे. प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने एमएमआरडीए लवकरच निविदा काढणार आहे. हे काम मार्गी लागताच या मार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे.

loading image
go to top