विविध मागण्यांसाठी MMRDA संघटना आक्रमक, कार्यालयाबाहेर आंदोलन

विविध मागण्यांसाठी MMRDA संघटना आक्रमक, कार्यालयाबाहेर आंदोलन

मुंबई: मागील तीन वर्षांपासून एमएमआरडीए प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ देत नसल्याने संतप्त झालेल्या एमएमआरडीए ऑफिसर्स असोसिएशन संघटनेने बुधवारी एमएमआरडीए कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने प्रशासनाला दिला.

एमएमआरडीएतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांची दखल प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्याने एमएमआरडीए ऑफिसर्स असोसिएशनने प्रशासनाला काही दिवसांपूर्वी द्वार सभेची नोटीस दिली होती. यानंतरही प्रशासनाने त्याची दखल घेतल्याने संघटनेने आंदोलन केले.

आंदोलनावेळी झालेल्या द्वारसभेत पदाधिकाऱ्यांनी प्राधिकरणाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली. कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी सुरक्षा योजना आणि सेवनिवृत्ती नंतर वैद्यकीय सुविधा योजना लागू करावी. तसेच त्वरित कॉर्पस फंडाची तरतूद करण्यात यावी अशीही संघटनेची मागणी आहे. तसेच बाहेरील आणि सेवानिवृत्त मंडळींना विविध विभागातील प्रमुख पदांवर दिलेली नियमबाह्य नियुक्ती यामुळे आंदोलक कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड रोष दिसून आला.

या सभेमध्ये संघटनेच्या वतीने सिद्धार्थ सत्वधीर, शांताराम चाळके, विद्या कोटक, सुबोध सुर्वे आणि विलास पवार यांनी प्रशासनाच्या मनमानी विरोधात सभेत तोफ डागली.  या समस्यांचे निराकरण लवकर झाले नाही तर आंदोलन यापुढेही चालू राहील, असा निर्णय द्वार सभेत घेण्यात आला.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

MMRDA organization aggressive Staff protest for various demands

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com