मनसे कळंबाेली कार्यकर्त्यांनी खड्डे बुजवून केली समाजसेवा 

गजानन चव्हाण
सोमवार, 9 जुलै 2018

खारघर (मुंबई) : खारघर  कोपरा पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर  पडलेल्या खड्ड्यामुळे सायंकाळी कामोठे ते सीबीडी पर्यंत झालेल्या वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कळंबोली येथील मनसे कार्यकर्ते धावून येत पडलेल्या खड्ड्यात खडीचा भराव करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीसा मदत केल्याने वाहतूक पोलिसांनी सहभागी झालेल्या कार्यकर्त्याचे आभार मानले. रात्री नऊ वाजे पर्यंत कार्यकर्ते काम करींत होते. यावेळी खारघर वाहतूक पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पांडे उपस्थित होते.  

सायन पनवेल महामागार्वरील खारघर कोपरा पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर माेठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून खारघर टोल नाका ते हिरानंदानी पुल असा जवळपास दोन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याचे दिसून येते. रविवार सायंकाळी चार नंतर कामोठे ते सीबीडी पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याने मनसेचे कळंबोली शहर अध्यक्ष अमाेल बाेचरे यांनी विवेक बोराडे, रामा सांवत, प्रशांत कदम, महिला शहर अध्यक्ष स्नेहल बागल, उल्हास कदम, भगवान खताल, गणेश लोखंडे, नितिन लोहार, संदीप अग्रवाल, वैभव टाकणे, विपुल बोचरे, ओंकार दळवी, लोकेश सपकाळ, सचिन पाटील आदी पदाधिकारी आणि सोबत तीन टेम्पो खडी, फावडा आणि घमेला घेवून पुलाच्या दोन्ही बाजूला पडलेल्या खड्ड्यात खडीचा भरणा केला.

तसेच रस्त्यावर वाहतूक पोलीस सोबत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सहकार्य केले. मनसेकडून रस्त्यावर पडलेले खड्डे  बुजविण्याचे काम सुरु असताना  मनसेच्या  नेत्या रिटाताई गुप्ता या कर्जतला जात असताना त्यांनी आपले वाहन उभे करून कार्यकर्त्यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. असेच उपक्रम हाती घेत जनतेच्या सेवा करा असा सल्ला देऊन कर्जतकडे मार्गस्थ झाल्या.

अमोल बोचर म्हणाले सायंकाळी कामोठे ते सीबीडी दरम्यान झालेली वाहतूक कोंडी सोशल मिडीयावर पहिली. रस्त्याने जाणारे अनेक जण काही महत्त्वाच्या कामासाठी जात असतात.तर काही आजारी असतात. अशावेळी मदत करावे असे सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने खडी, घमेले, फावडे घेऊन खड्डे भरले. तसेच वाहतूक पोलिसांच्या सोबत राहून रात्री  नऊ वाजे पर्यंत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत केली. अधिकारी प्रवीण पांडे यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे आभार तर मानलेच परंतु रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी आभार मानले.

Web Title: mns activist refill the potholes