नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांची सुटका

दिनेश चिलप मराठे
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई ताडदेव एसी मार्केट येथील नानार प्रकल्प कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या पोलिस कस्टडित ठेवल्यानंतर सोडण्यात आले.

मुंबादेवी - मुलुंड येथील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभेत रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाला विरोध केला. मुंबई ताडदेव एसी मार्केट येथील नानार प्रकल्प कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या मनसेच्या सचिन गोळे, राकेश जाधव, योगेश चीले, चेतन लब्दे आणि चेतन जगताप या कार्यकर्त्यांना सोमवार दिनांक 16 ला ताडदेव पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना अटक केल्यानंतर सातरस्ता येथील पोलिस कस्टडित ठेवण्यात आले होते. आज दिनांक 19 रोजी सायंकाळी गिरगाव कोर्टात प्रत्येकी 15 हजार रूपयांच्या रोख जामिनावर सर्वांची सुटका करण्यात आली.

वरिष्ठ वकील राजेन्द्र शिरोडकर, एडवोकेट शरद राऊत, एडवोकेट मुकेश भालेराव आणि एडवोकेट अर्चित साखरकर यांनी अटकेतील आरोपींची जामीन मिळण्यासाठी न्यायालयात बाजू मांडली. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, पदाधिकारी संतोष धुरी, धनराज नाईक, अखिल चित्रे, केशव मुळे, शशांक नागवेकर, विनोद अरगिले, प्रशांत गांधी, दयानंद नागवेकर यांचे सोबत असंख्य महाराष्ट्र सैनिक कोर्टाच्या आवारात उपस्थित होते. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MNS activists protesting against the Nawar project