स्वातंत्र्य दिनी मालाडमध्ये खड्डयांविरोधात आंदोलन

Mumbai
Mumbai

मुंबई : मुसळधार पावसाने उघडीप घेतली असली तरी पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे व खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यात निर्माण झालेले डास यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही पालिकेने दुर्लक्ष केल्याने आज स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने येथील नागरिकांनी रस्त्यावर उतरून पालिकेविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन  केले.

मुंबईत केवळ 414 खड्डे असल्याचा दावा पालिकेने केला आहे. मात्र पावसामुळे अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. मालाड परिसरातील काचपाडा येथील डीमोनेट लेनवर खड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. मात्र रस्ता खासगी असल्याचे कारण देत मालाडच्या पी उत्तर विभागाने रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी झटकत हात वर केले. यामुळे या परिसरात अपघातांचे प्रमाण वाढल्याने रहिवाशी संतप्त झाले आहेत.

मालाडमधील या रस्त्याच्या दुरुस्तीकडे पालिकेने गेल्या 15 वर्षांपासून दुर्लक्ष केलं आहे. यामुळे 12 ही महिने या रस्त्याची अवस्था बिकट असते. मुसळधार पावसामुळे तर या रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्या खड्ड्यात पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव ही होत आहे. यामुळे या परिसरात मलेरियासारखे आजार डोकं वर काढण्याची भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com