कल्याण पूर्व मध्ये मनसेचे आंदोलन

रविंद्र खरात 
रविवार, 1 जुलै 2018

मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांचे बाजार भावाप्रमाणे दर लागू करण्यात यावे यासाठी मनसे आक्रमक झाली असून आज रविवार ता. 1 जुलै ला कल्याण पूर्व रीमधील मँट्रो मॉल आयनॉक्स मध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले.

कल्याण - राज्यातील मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ हे बाजार भावापेक्षा आवाच्यासव्वा  जास्त दराने विकले जातात. बाजार भावाप्रमाणे दर लागू करण्यात यावे यासाठी मनसे आक्रमक झाली असून आज रविवार ता. 1 जुलै ला कल्याण पूर्व मधील मँट्रो मॉल आयनॉक्स मध्ये मनसेच्या पदाधिकारीनी आंदोलन करत यावेळी सिनेमा पहायला आलेल्या लहान मुलांना पॉपकॉन व चिप्स वाटून निषेध नोंदवला. 

राज्यातील विविध शहरात असलेल्या मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ हे बाजार भावापेक्षा आवाच्यासव्वा जास्त दराने विकले जातात. बाजार भावाप्रमाणे दर लागू करण्यात यावे यासाठी मनसे ने आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले असून आज ता. 1 जुलै ला दुपारी 2 च्या सुमारास कल्याण पूर्व मधील मेट्रो मॉल आयनॉक्स मध्ये मनसे उपशहर अध्यक्ष संजय राठोड, मनविसे उपशहर अध्यक्ष अंकुश राजपूत, मनसे विभाग अध्यक्ष-बंडू पिंगळे, विनीत भोई, मनसे शाखा अध्यक्ष-विशाल भोईटे,अविनाश गायकवाड, हरिश शेलार, मनविसे शाखा अध्यक्ष-अमर चिकणे, कुणाल क्षेत्रे, बिनु अँलेक्स, उपशाखा अध्यक्ष मनविसे ऋषिकेश चिकणे, महाराष्ट्र सैनिक- विशाल यशवंतराव,सागर चौधरी, अविनाश भरभटे आदी पदाधिकाऱ्यानी आंदोलन केले. यावेळी खाद्यपदार्थ हे बाजार भावापेक्षा आवाच्यासव्वा जास्त दराने विकले जातात. बाजार भावाप्रमाणे दर लागू करण्यात यावे अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आणि यावेळी निवेदन दिले तर सिनेमा पहायला आलेल्या लहान मुलांना पॉपकॉन व चिप्स वाटून निषेध नोंदवला.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MNS agitation for multiplex food prices at kalyan mumbai