मनसेचा राष्ट्रवादीकडे 'या' तीन जागांसाठी प्रस्ताव

मनसेचा राष्ट्रवादीकडे 'या' तीन जागांसाठी प्रस्ताव

मुंबई- लोकसभेचे पडघम वाजू लागले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे तीन जागांची मागणी केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील प्रत्येकी एक जागा मनसेला देण्याची विनंती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीने या तीन जागा मनसेला सोडल्यास मनसे आघाडीत सामील होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

मुंबईतील ईशान्य मुंबई, ठाणे आणि नाशिकमधील दिंडोरी या लोकसभेच्या तीन जागा मनसेला मिळाव्यात, अशी मनसेची मागणी आहे. तीन नाही सोडल्या तरी दोन जागा राष्ट्रवादी मनसेसाठी सोडेल आणि नवा मित्र जोडेल, अशी चर्चाही सध्या सुरु आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यातील जवळीक वाढल्याचं चित्र अलीकडच्या काळात अनेकदा दिसून येत आहे. दरम्यान, राज ठाकरेंना हव्या असलेल्या तीन जागांपैकी ईशान्य मुंबई आणि दिंडोरी मतदारसंघात सध्या अनुक्रमे किरीट सोमय्या आणि हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपचे खासदार आहेत, तर ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे हे खासदार आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातील या तीन जागांवर आत्तापर्यंत पक्षाची कामगिरी निराशाजनकच राहिली आहे आणि सध्याचं गणित काय आहे, हे पाहूनच शरद पवार अंतिम निर्णय घेतील, हे स्पष्टच आहे. सध्या तरी, ते दोन जागा मनसेसाठी सोडतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com