पदाधिकारी आहेत; पण कार्यकर्ते कुठे आहेत?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबईपासून जवळ असणाऱ्या रायगड जिल्ह्यात मनसे हव्या त्या प्रमाणात वाढली नाही. पक्षस्थापनेच्या सुरुवातीला तरुणांचा ओढा पक्षाकडे होता. तरुण मोठ्या प्रमाणात असल्याने काही प्रमाणात पक्षाची ताकद जिल्ह्यात दिसून येत होती. महाड, कर्जत नगरपालिकांत; तसेच जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये पक्षाचे उमेदवार निवडून आले होते; मात्र प्रत्येक आंदोलनानंतर पक्षाची बदलणारी भूमिका; तसेच वरिष्ठ नेतृत्वाच्या दुर्लक्षामुळे कार्यकर्ते मनसेपासून दुरावत गेले. परिणामी पक्षात सध्या पदाधिकारीच दिसत आहेत. एकाही पदाधिकाऱ्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्याचे दिसून येत नाही.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यात मनसेकडून इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्ष तालुकास्तरावर पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उमेदवारांची चाचपणी करीत आहेत. काही ठिकाणी निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत; मात्र येथे पक्षाची मते किती, हे जाणून घेण्यापलीकडे काहीही हाती लागणार नसल्याचे चित्र आहे.

प्रचारातील स्टार
मनसेचा प्रचार जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी यांच्या मार्गदर्सनाखाली होणार असल्याचे चित्र आहे. त्यांना जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, अतुल भगत, राजेय भोसले आदींची साथ मिळेल. त्यासह जिल्ह्यातील इतर पदाधिकारी आपापल्या तालुक्‍यात प्रचार करतील. प्रचारात मराठीचा मुद्दा; तसेच राज ठाकरे यांच्या नावावरच मनसे मते मागणार असल्याचे दिसून येते.

Web Title: mns in bmc