मनसेच्या प्रचारात तीन हजार महिला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जानेवारी 2017

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल तीन हजार महिलांची फौज प्रचारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक शहरात केलेल्या विकासकामांची माहिती या महिला मुंबईत घरोघरी पोचवणार आहेत.

मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी मुंबईतील तब्बल तीन हजार महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नाशिक शहरात केलेली विकासकामे नुकतीच दाखवली. या दौऱ्यासाठी मुंबईतून खास बसची व्यवस्था करण्यात आली होती. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क, बाळासाहेब ठाकरे स्मारक शस्त्रसंग्रहालय, बोटॅनिकल गार्डन आदी विकासकामे; तसेच शहरातील रस्त्यांसारख्या सोई-सुविधांची पाहणी या महिलांनी केली. शालिनी ठाकरे यांनी सांगितले, की महिला पदाधिकारी व कार्यकर्त्याच आमच्या पक्षाच्या स्टार प्रचारक आहेत. त्यांना पक्षाने केलेल्या विकासकामांची माहिती चांगल्या पद्धतीने व्हावी, यासाठी नाशिकचा पाहणी दौरा करण्यात आला. आता या महिला त्यांच्या परिसरात पक्षाने केलेल्या विकासकामांची माहिती पोचवतील.

Web Title: MNS Campaigning for three thousand women