महापालिका निवडणुकीत मनसे उमेदवार परीक्षामुक्त?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

मुंबई - महापालिका निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांची परीक्षेतून सुटका होण्याची शक्‍यता आहे. मागील निवडणुकीत ही परीक्षा चर्चेचा विषय ठरला होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विभाग अध्यक्षांकडून इच्छुक आणि अपेक्षित उमेदवारांची यादी मागवल्याने ही आगामी महापालिका निवडणुकीसाठी ही परीक्षा रद्द होण्याची चर्चा आहे.

मागील महापालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी राज ठाकरे यांनी इच्छुकांची लेखी परीक्षा घेऊन तिकिटे दिली होती. तेव्हा तिकीटवाटपावरून बराच गोंधळ झाला होता, तसेच नगरसेवकही चांगली चमक दाखवू शकले नाहीत. 29 पैकी केवळ चार ते पाच नगरसेवकांची कामगिरीच दखलपात्र ठरली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही मनसेला चांगलाच फटका बसला होता. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीही राज परीक्षा घेणार का? याकडे लक्ष लागले आहे. ही शक्‍यता आता धूसर झाली आहे. असे असले तरी राज आता कोणता नवा प्रयोग करणार, याबाबत इच्छुकांमध्ये चलबिचल सुरू आहे.

Web Title: mns candidate exam free in municipal election