'मोदी म्हणतात, म्हणून मी तुला छळतोय!'

वृत्तसंस्था
शनिवार, 19 जानेवारी 2019

राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्यंगचित्र प्रसिद्ध करताना मोदींनी सर्वसामान्य भारतीय नागरिकाला आपल्या हाताने उचलल्याचे दाखविण्यात आले असून, त्याला शीर्षक म्हणून मी तुला छळतोय असे तो बोलताना दाखविण्यात आले आहे.

मुंबई : आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या निर्णयानंतर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींना लक्ष्य केले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून व्यंगचित्र प्रसिद्ध करताना मोदींनी सर्वसामान्य भारतीय नागरिकाला आपल्या हाताने उचलल्याचे दाखविण्यात आले असून, त्याला शीर्षक म्हणून मी तुला छळतोय असे तो बोलताना दाखविण्यात आले आहे.

मोदी हे सतत काँग्रेसवर टीका करताना म्हणतात की काँग्रेसने मला छळले. आता त्याचाच बदला म्हणून मोदी सर्वसामान्य भारतीय नागरिकांना आपल्या बोटांत पकडून छळत असल्याचे राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून दाखविले आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वीही मोदींवर व्यंगचित्र रेखाटत त्यांचे निर्णय व देशाची होत असलेली फसवणूक ही व्यंगचित्रातून स्पष्ट केलेली आहे.

Web Title: MNS chief Rah Thackeray cartoon on Narendra Modi