'या वर्माजी बसा'; राज ठाकरेंचा मोदींवर वार
राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात त्यांनी प्रत्येकाला 'जागा' दाखवली! असे शिर्षक दिले आहे. या व्यंगचित्रात सरन्यायाधीश सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना या वर्माजी बसा असे म्हणत आहेत. तर, मोदी हे वर्मांकडे बघून न्यायालयात बोलताना दाखविण्यात आले आहेत.
मुंबई : सीबीआयमधील वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वार केला आहे.
#CBIvsCBI #AlokVerma #NarendraModi #SupremeCourt #RajThackeray #PoliticalCartoon pic.twitter.com/TET8s5aD9Z
— Raj Thackeray (@RajThackeray) January 8, 2019
राज ठाकरे यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात त्यांनी प्रत्येकाला 'जागा' दाखवली! असे शिर्षक दिले आहे. या व्यंगचित्रात सरन्यायाधीश सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना या वर्माजी बसा असे म्हणत आहेत. तर, मोदी हे वर्मांकडे बघून न्यायालयात बोलताना दाखविण्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांनी एका रात्रीत तडकाफडकी काढून टाकलेल्या आलोक वर्मा यांची सीबीआयच्या संचालकपदी सर्वोच्च न्यायालयाने फेरनियुक्ती केली, असा विषयही लिहिण्यात आला आहे.
सुटीवर पाठवण्याच्या आदेशाविरोधात सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. केंद्र सरकारने 23 ऑक्टोबरला सीबीआयचे संचालक आलोक वर्मा विशेष संचालक राकेश अस्थाना यांना सुटीवर पाठवले होते; तसेच सहसंचालक एम. नागेश्वर राव यांना हंगामी संचालक म्हणून नेमले होते. तसेच 13 अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या होत्या. तत्पूर्वी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध लाचखोरीच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार, सीव्हीसी, सीबीआय, आलोक वर्मा आणि विरोधी पक्षाचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवत आज निर्णय दिला. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाला झटका बसला आहे.