सबसे हटके! राज ठाकरेंच्या 'या' फोटोची सोशल मीडियावर धूम

पूजा विचारे
Monday, 31 August 2020

राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज ठाकरे यांचा एक नवीन फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांचा हा नवा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज ठाकरे यांचा एक नवीन फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे त्यांचा हा नवा लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

नव्या फोटोत त्यांची वाढलेली दाढी दिसत आहे. तसंच त्यांनी  गॉगल आणि टीशर्ट घातला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा नवा लूक चांगलाच आकर्षक असा दिसत आहे. राज यांचा नव्या लूकमधील फोटो तुफान व्हायरल झाला आहे. 

व्हायरल झालेल्या फोटोत राज ठाकरे यांनी दाढी वाढवली आहे. गॉगल घातला आहे. राज ठाकरेंचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून शेअर केला जात आहे. 

 

राज ठाकरे बहुतेक वेळा कुर्ता पायजमा अशाच वेशभूषेत दिसतात.  पत्रकार परिषदेतही ते पांढरेशुभ्र कुर्त्यामध्ये दिसतात.एखाद्या विशेष कार्यक्रमात त्यांचा रंगीत कुर्ता पाहायला मिळतो. 

हेही वाचाः  महाविकास आघाडीचा वाद 'तीन हात नाक्या'वर, काँग्रेसच्या बॅनरमुळे राजकीय खळबळ

यापूर्वीही अनेकदा राज ठाकरे यांच्या हटके लूकची चर्चा रंगली आहे. राज यांनी काही वर्षांपूर्वी लांब केस वाढवले होते. तेव्हाही त्यांच्या त्या लूकची फार चर्चा झाली होती. जानेवारी महिन्यात मुंबईत मनसेचं महाअधिवेशन झालं. या अधिवेशनातील राज यांचा लूकही चर्चेचा विषय ठरला होता.

अधिक वाचाः  घंटानाद आंदोलनाची छायाचित्रे पाहिल्यावर समजलं की...शिवसेनेचा भाजपला चिमटा

लॉकडाऊनच्या काळात अनेक नेते वेगवेगळ्या स्टाईलमध्ये दिसत आहेत. काहींनी हेअर स्टाईल म्हणून जास्त केस वाढवलेत, तर काहींनी दाढी वाढवत आपला लूक बदलला आहे. यामध्ये उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. 

MNS Chief Raj Thackeray New Look Viral Social Media Black And White Pic


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Chief Raj Thackeray New Look Viral Social Media Black And White Pic