उत्तर भारतीयांच्या मंचावरच दिसणार राज ठाकरे 

उत्तर भारतीयांच्या मंचावरच दिसणार राज ठाकरे 

मुंबई : मुंबईतील कांदिवलीतील बुराभाई हॉल येथे 2 डिसेंबरला होणाऱ्या उत्तर भारतीयांच्या महापंचायतीच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून राज ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आले आणि राज यांनी हे आमंत्रण स्विकारले असल्याची माहिेती मनसेच्या संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

राज आता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ते या कार्यक्रमात उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत. 12 ऑक्टोबरला ठाकरे यांना उत्तर भारतीय महापंचायतीने कार्यक्रमाचे निमंत्रण दिले होते. त्यावेळी राज यांनी आयोजकांना कोणतेही आश्वासन दिले नव्हते. परंतु, आता ते उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परप्रांतियांविरोधात नेहमी आक्रमक भूमिका घेणारे मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे लवकरच उत्तर भारतीयांच्या मंचावर दिसणार आहेत. उत्तर भारतीयांविरोधातील नेते अशीच राज यांची देशभरात प्रतिमा आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षाची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com