मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, राज ठाकरेंचं उद्धव ठाकरेंना पत्र

पूजा विचारे
Monday, 14 September 2020

डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांची भेट घेत मदतीची मागणी केली. त्यामुळे राज ठाकरे यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. 

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाच्या संकट काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी डॉक्टर, पोलिस, नर्स, पालिका कर्मचाऱ्यांना आपली भूमिका चोख बजावली. कर्तव्य बजावत असताना अनेक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसमुळे बरेच आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना आपला जीव गमावावा लागला आहे. त्यामुळे त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य विमाच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे आला आहे. याच पार्श्वभूमीवरुन शुक्रवारी डॉक्टरांच्या शिष्टमंडळानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. डॉक्टरांना विमा नाकारल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांची भेट घेत मदतीची मागणी केली. त्यामुळे राज ठाकरे यांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. 

मला काही खासगी सेवेतील डॉक्टरांचं शिष्टमंडळ भेटायला आलं होतं. त्यांनी त्यांचे या कोरोनाच्या काळातील जे अनुभव मला सांगितले, जी मेहनत ते घेत आहेत ते खरोखरच प्रशंसनीय आहे. कोरोना संसर्गाच्या काळात सरकारने खासगी डॉक्टरांना दवाखाने बंद न करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉक्टरांनी व्यवसायाशी बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णसेवा सुरुच ठेवली. पण त्यांनी मला सरकारी अनास्थेची जी एक घटना सांगितली त्याने मात्र माझं मन विषण्ण झालं, असं राज ठाकरेंनी पत्रात लिहिलं आहे. या पत्रात  खासगी डॉक्टरांच्या समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. 

मोठी बातमीः  मुंबईकरांनो! मोकळा श्वास घ्या, मुंबईतील हवेची गुणवत्ता उत्तम

पत्रात लिहिलं की...

खासगी सेवेतील डॉक्टरांना विमाकवच नाकारणे असंवेदनशील आहे. खासगी सेवेतील डाँक्टरांना मृत्यूनंतरही कुटुंबाला 50 लाखाचा विमा मिळायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले.  राज्य सरकारने सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालयं, पॅथॉलॉजी लॅब्स यांना आदेश दिला की त्यांनी त्यांची सेवा अजिबात बंद ठेवू नये आणि रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज रहावं. माझ्या माहितीप्रमाणे राज्यातील बहुसंख्य खाजगी सेवेतील डॉक्टर्सनी आणि इतर खाजगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांची त्यांच्या व्यवसायाशी असलेली बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णांची सेवा सुरु ठेवली, असं  ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यादरम्यान सरकारने कोव्हिड योद्धे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी मग ते सरकारी असो की खासगी या सर्वांना 50 लाखाचं विमाकवच देण्याचं परिपत्रक सरकारने काढलं. मात्र आता खासगी डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या विम्याचा लाभ देण्याचं सरकार नाकारत आहे. हे डॉक्टर खासगी सेवेत होते म्हणून नाकारलं जात असल्याचं कारण दिलं जात आहे. पण मुळात हे विमा कवच केंद्राच्या योजनेप्रमाणे मिळत असताना, राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं?

 

सरकार जर डॉक्टरांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणार असेल, मात्र त्याचवेळी स्वत:ची जबाबदारी विसरणार असेल तर हे चुकीचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याप्रकरणी लक्ष घालून खासगी सेवेतील डॉक्टरांनाही योग्य न्याय द्यावा, असं राज ठाकरे म्हणाले.  मुळात जर खाजगी सेवेतील डॉक्टर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जर या विम्याचं कवच केंद्र सरकारच्या योजनेनुसार उपलब्ध आहे तर राज्य सरकार कोणत्या न्यायाने ते नाकारत आहे? याला असंवेदनशीलता नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? सरकार डॉक्टर्सना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणार पण सरकार स्वतःची जबाबदारी विसरणार हे कसं चालेल? हे चूक आहे, असं  राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मोठी बातमीः  सुशांत सिंह मृत्यूप्रकरणः बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी आलिशान कारमधून ड्रग्सची तस्करी

माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, तुम्ही या विषयांत तात्काळ लक्ष घाला आणि संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन खाजगी सेवेतील असो वा सरकारी सेवेतील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी असोत यांच्या अर्जांवर तात्काळ कार्यवाही करा. आपण या विषयांत या डॉक्टर्सना आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य न्याय द्याल, अशी मला आशा आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

MNS Chief Raj Thackeray Wrote letter CM Uddhav Thackeray Doctors Insurance


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS Chief Raj Thackeray Wrote letter CM Uddhav Thackeray Doctors Insurance