राज ठाकरेंचा नवा लूक 'या' फोटोत स्पष्ट दिसतोय, लोकप्रिय नेत्याने लूक बदलाय तर चर्चा तर होणारच

सुमित बागुल
Tuesday, 1 September 2020

राज ठाकरे यांच्या नवीन लूक पूर्णपणे रिव्हील झाला तो त्यांच्याच काही फोटोंवरून. राज्यातील काही संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केलाय. त्यावेळी राज ठाकरे हे सफेद कुर्त्यात पाहायला मिळाले.

मुंबई : लॉकडाऊन आपल्याला आणखी काय करायला लावतोय काही सांगता येत नाही. दिवसेंदिवस घरात राहण्याची एव्हाना आपल्या सर्वांना सवय झालीये. अनेकांनी त्यांच्या दाढी मिशा वाढवल्या. अनेकांनी तीन ते चार महिने केस कापले नाहीत. किंवा अनेकांनी अगदी ट्रीमर घेऊन टकलू करायचा निर्णय घेतला. याभध्ये सर्वसामान्यांपासून थेट नेते आणि कलाकारांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. 

महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते राज ठाकरे यांनीही आपल्या स्वतःच्या लूकमध्ये आता बदल केलाय. राज ठाकरे यांचे काही फोटो नुकतेच समोर आले आहेत. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मेकओव्हर झालेला पाहायला मिळतोय.  राज ठाकरे आपल्या सभांसाठी किंवा कायमच एकदम क्लीन शेवमध्ये पाहायला मिळालेत. मात्र आता राज ठाकरे यांनी दाढी वाढवत त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या चाहत्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

महत्त्वाची बातमी : मन सुन्न करून टाकणाऱ्या क्रॉफर्ड मार्केट हिट अँड रन दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

राज ठाकरे यांच्या नवीन लूक पूर्णपणे रिव्हील झाला तो त्यांच्याच काही फोटोंवरून. राज्यातील काही संघटनांच्या प्रमुख नेत्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात प्रवेश केलाय. त्यावेळी राज ठाकरे हे सफेद कुर्त्यात पाहायला मिळाले. या फोटोंमध्ये राज ठाकरे यांची फ्रेंच कट दाढी व्यवस्थित पाहायला मिळतेय. राज ठाकरे यांचा नवीन लूक त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या चाहत्यांना प्रचांत आवडतोय.

महत्त्वाची बातमी आदित्यसाठी शिवसेनेनं काँग्रेसवाल्यांना पगारावर ठेवलंय; काँग्रेसच्या आरोपानंतर भाजप नेता संतापला

जानेवारीत मुंबईत मनसेचे महाअधिवेशन झाले, फेब्रुवारीत बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसेने मोठा  मोर्चा काढला. या दोन्ही मोठ्या कार्यक्रमांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे पंधरा कुडता क्लीन शेव आणि डोक्यावर भगव्या तिला असे पाहायला मिळाले होते.

mns chief raj thackerays new look with french beard clearly seen in these photos


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns chief raj thackerays new look with french beard clearly seen in these photos