'नव्या थापांचा मोदींनी उडविला पतंग'

मंगळवार, 15 जानेवारी 2019

संक्रांतीला मोदी फक्त पतंग नाही तर त्यासोबत थापा उडवत आहेत, अशा आशयाचं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 15) रेखाटलं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने नुकताच सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयदेखील थापच आहे, असं राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून सुचवलं आहे.

मुंबई- संक्रांतीला मोदी फक्त पतंग नाही तर त्यासोबत थापा उडवत आहेत, अशा आशयाचं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 15) रेखाटलं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने नुकताच सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयदेखील थापच आहे, असं राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून सुचवलं आहे.

सवर्ण आरक्षणाच्या थापेचा पतंग आकाशात उडत असताना काही जुने पतंग मात्र गच्चीवर पडून आहेत. त्यातील प्रत्येक पतंगावर मोदींची आश्वासने, त्यांचे निर्णय आणि योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. मेक इन इंडिया, नोटाबंदी, स्वच्छ भारत, जीएसटी, देशी काळा पैसा, डिझेल-पेट्रोलचे दर, कर्जमाफी, प्रतिवर्षी 2 कोटी रोजगार, परदेशी काळा पैसा, नीरव मोदी, मल्ल्या, चोक्सी आणि इतर असा मजकूर असलेले पतंग गच्चीवर पडल्याचं चित्र राज यांनी त्यांच्या व्यंगचित्रात दाखवलं आहे. मोदी केवळ थापांचे पतंग उडवतात. प्रत्येकवेळी नव्या थापा मारतात, असं राज यांनी व्यंगचित्रातून सुचवलं आहे. 

मोदी सरकारनं गेल्याच आठवड्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यानंतर लगेचच संसदेत याबद्दलचं विधेयक मंजूर करुन घेण्यात आलं. मात्र अनेक घटनातज्ज्ञांनी हे आरक्षण तांत्रिकदृष्ट्या टिकणार नाही, असा अंदाज व्यक्त केला. त्यावरुन मोदींची नवी थाप असा संबंध व्यंगचित्रातून राज ठाकरे दर्शवला आहे. मोदी अमित शहा, भक्त आणि काही मीडियासोबत पतंग उडवत आहेत. त्या पतंगावर 'नव्या थापा 10% आरक्षण' असा मजकूर आहे. मोदी आणि आसपासचा गोतावळा आनंदानं पतंग उडवत असल्याचं राज यांनी व्यंगचित्रात दाखवलं आहे. मात्र त्याच गच्चीवर असलेल्या भाजपनं याकडे पाठ फिरवलेल्याचे दाखवण्यात आले आहे.

Web Title: mns chief Raj Thackrey takes a dig at modi through cartoon over 10 percent reservation