मनसे नगरसेवकावर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. महिलेला आक्षेपार्ह मेसेजेस पाठवल्या प्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जाधव यांच्या पत्नी स्नेहल यांना वॉर्ड क्रमांक 192 मधून मनसेने उमेदवारी दिली आहे. पत्नीचा प्रचार करण्यासाठी जाधव तक्रारदार महिलेच्या घरी गेले होते. त्यानंतर दारूच्या नशेत व्हॉट्‌सऍपवरून जाधव यांनी रात्रभर आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडिओ कॉल केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रार अर्जात केला आहे. व्हॉट्‌सऍपवर छायाचित्र पाठवण्याचा आग्रह जाधव यांनी केल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: MNS corporator crime