'काय रे लाचारांनो'.शिवसेनेच्या जाहिरातबाजीवर मनसेनं लगावला टोला

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

शिवसेनेकडून जाहिरातबाजी झाल्याचं चित्र मुंबईत बुधवारी पाहायला मिळालं. या जाहिरातबाजीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. मुंबईला कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. अशातच राज्य सरकार वेगवेगळ्या पातळीतून नागरिकांना मदत करताना दिसत आहे. सर्वच राजकीय पक्ष ही नागरिकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. मात्र ही मदत करताना शिवसेनेकडून जाहिरातबाजी झाल्याचं चित्र मुंबईत बुधवारी पाहायला मिळालं. या जाहिरातबाजीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा: राज्यपालांनी बोलावलेल्या बैठकीला उद्धव ठाकरे गैरहजर, पण...

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून यावर टीका केली आहे. काय रे लाचारानो हे पण आधीच छापले होते का? कशावर कोणाचा फोटो टाकायचा हे कळत नाही ?आता म्हणतील राजकारण नको, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

 

 

बुधवारी कुलाबा विधान परिसरात शिवसेनेकडून महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचं वाटप करण्यात आलं. शिवसेनेकडून गरजूंसाठी ५०० सॅनिटरी नॅपकिन्सची पाकिट वाटण्यात आली. या सॅनिटरी पॅड्सच्या पाकिटावर आदित्य ठाकरेंचा फोटो लावण्यात आला होता. युवती आणि युवा सेनेकडून या मोफत सॅनिटरी पॅड्सचं वाटप केलं गेलं. त्यावर आदित्य ठाकरे आणि शिवसेना फोटो लावून जाहीरातबाजी केली गेली. कुलाबा परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांकडून हे वाटप करण्यात आलं आहे. त्यामुळे अशी परिस्थिती असताना जाहीरातबाजी करण्याची गरज आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

हेही वाचा: कोरोना.. जमावबंदी नव्हे तर साड्यांची खरेदी महत्वाची! पनवेलमध्ये घडला हा अजब प्रकार..

मुंबईतली परिस्थिती गंभीर:

सध्या मुंबईत कोरोनाचा कहर जास्त आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणं सील करण्यात आलेत. काही कंन्टेंमेंट झोन आहे. त्यामुळे महिलांना घराबाहेर पडत येत नाही. या नागरिकांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, राजकीय पक्ष पुढे सरसावले आहे. असाच प्रयत्न करुन शिवसेनेनं महिलांसाठी सॅनिटरी पॅड्सचं वाटप केलं, पण त्यावर जाहीरातबाजी करणं खरंच गरजेचं होतं का? असाच सवाल उपस्थित केला जात आहे. 

MNS criticized shivsena for aditya thackerays photo on sanitary pads packets read full story 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS criticized shivsena for aditya thackerays photo on sanitary pads packets read full story