मनसे कामगार संघटनेचा ठसा आता कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर मध्येही

दिनेश गोगी
मंगळवार, 3 जुलै 2018

उल्हासनगर : गेल्या तीन वर्षात उल्हासनगरात अनपेक्षितपणे ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेचा ठसा कल्याण-डोंबिवली महानगरपालिका सोबतच अंबरनाथ-बदलापूर नगरपरिषदेत देखील वाढणार आहे.या तिन्ही शहराची जबाबदारी उल्हासनगर पालिका युनिट अध्यक्ष दिलीप थोरात यांच्याकडे सोपवण्यात आल्याने तेथील कर्मचाऱ्यांच्या समस्या मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी तीन चार वर्षांपूर्वी कामगार कर्मचारी संघटना या विंगची स्थापना करून प्रदेशाध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांची नियुक्ती केली.देशपांडे यांनी उल्हासनगर पालिका युनिटच्या अध्यक्षपदी दिलीप थोरात यांची निवड केली होती.या निवडीचे सार्थक करताना थोरात यांनी अल्पावधीतच विक्रमी सदस्य नोंदणी केल्यावर तत्कालीन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी मनसे कामगार संघटनेला अधिकृत कार्यालय दिले.या कार्यालयाचे उदघाटन राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी केले होते.

दिलीप थोरात हे कामगारांचे अनेक प्रश्न समस्या मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याने  त्याची पोचपावती किंबहूना शाबासकी म्हणून प्रदेशाध्यक्ष संदीप देशपांडे यांनी थोरात यांच्याकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, अंबरनाथ-बदलापूर नगरपरिषदच्या युनिट अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. या शहरातही मनसे कामगार संघटना जोमाने काम करून कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार, असे दिलीप थोरात यांनी सांगितले.

Web Title: mns employee union is now in kalyan dombivali ambarnath badalapur