मनसे मेळाव्याची निमंत्रणपत्रिका पाहिली का ? निमंत्रणपत्रिकेतून कसले संकेत ?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्ष हातमिळवणी करणार का याची.  येत्या काळात, 'परिस्थिती पाहून मनसेसोबत जावं की नाही याबद्दल विचार केला जाईल' असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली होती. अशात राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष राज्यातील राजकारणात रिकामी झालेली  हिंदुत्ववादी शिवसेनेची जागा काबीज करण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर वाटचाल करताना पाहायला मिळतेय असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. 

मोठी बातमी - ...अन्‌ मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, 'मी' आलोच तिकडे..!

दादर परिसर भगवा

आज सकाळीच मुंबईतील दादर परिसर भगवा झालेला पाहायला मिळाला. आज भगवा झालेला दादर परिसर शिवसेनेमुळे नाही तर मनसेमुळे भगवा झाला होता. शिवसेनाभवन परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून बॅनरबाजी  करत, बॅनर्सवर राज ठाकरे यांचे भगव्या बॅकग्राउंडवर बॅनर्स आणि त्यावर "सतराशे साठ, महाराष्ट्र धर्मा साठी एकच सम्राट" असा आशय लिहिला होता. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आता अधिकृत निमंत्रणपत्रिका समोर येताना पाहायला मिळतेय. 

Image may contain: 1 person, text that says "महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यव्यापी अधिवेशन २०२० विचार महाराष्ट्र धर्माचा! निर्धार हिंदवी स्वराज्याचा! गुरुवार, २३ जानेवारी २०२०. सकाळी १०:०० ते संध्या नेस्को सेंटर गोरेगांव (पू.)"

मोठी बातमी पतंग आला..; चिमुकल्याला घेऊन गेला!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिलावहिला मेळावा येत्या २३ तारखेला मुंबईत पार पडणार आहे. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याच्या निमंत्रणपत्रिकेचं पहिलं पान समोर येताना पाहायला मिळतंय. यामध्ये महाराष्ट्राला संपूर्ण भगवा रंग दिलेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर राज ठाकरे देखील या निमंत्रणपत्रिकेत पाहायला  मिळतंय. यावर "विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा" असं लिहिण्यात आलंय. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आता मराठीच्या मुद्यावरून हिंदुत्वाच्या मुद्याकडे वाटचाल करताना दिसतेय असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.

मोठी बातमी बदल्यांमध्ये पहिला दणका 'ब्रिजेश सिंग' यांना;'या' अधिकाऱ्यांची झालीये उचलबांगडी

येत्या २३ तारखेला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिलावहिला मेळावा देखील आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला झेंडा देखील बदलण्याचा देखील निर्णय घेतलाय.

mns first ever melawa in mumbai see what is written on the cover page on invitation

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mns first ever melawa in mumbai see what is written on the cover page on invitation