मनसे आली गोरेगावकरांच्या मदतीला

निसार अली
रविवार, 8 एप्रिल 2018

कंत्राटदार करत असलेल्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व शालेय विद्यार्थी यांना नाहक त्रास होत आहे. परिसरात धूळीचे साम्राज्य झाले आहे.

मुंबई - जवाहर नगर मार्ग क्र.12 गोरेगाव (प.) प्रभाग क्र. 55/58, येथे महानगरपालिका खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम करत आहे. कंत्राटदार करत असलेल्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व शालेय विद्यार्थी यांना नाहक त्रास होत आहे. परिसरात धूळीचे साम्राज्य झाले आहे. रस्ता खणून 6 दिवस होऊन गेले, अजूनही येथे डांबरीकरणास सुरवातही नाही. यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. याबाबत येथील नागरीकांना मनसेची साथ मिळाली आहे.

मनसेने ठेकेदाराला व संबंधित आधिकाऱ्याला इशारा दिला आहे. रस्ता डांबरीकरणाचे काम लवकरात लवकर करण्याचे बजावले आहे. अन्यथा मनसे पद्धतीने विरोध आंदोलन करणार असल्याचेही अनंत सूद (बाबू)-युनियन संघटक मनसे महापालिका कर्मचारी सेना सांगितले आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MNS Helps to Goragaon People For Road Work