esakal | बंदी असूनही दहीहंडी फोडणाऱ्यांविरोधात सहा गुन्हे !
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

बंदी असूनही दहीहंडी फोडणाऱ्यांविरोधात सहा गुन्हे !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अंधेरी : मुंबईतील (Mumbai) उत्सवांचा राजा समजल्या जाणाऱ्या दहीहंडीवर सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने सरकारने (Goverment) मानवी थर लावून उत्सव साजरा करण्यावर बंदी घातली होती. त्यामुळे नेहमीचा गोपाळकाल्याचा जल्लोष यंदा मुंबईत (Mumbai) दिसला नाही; मात्र राज्य सरकारचा (State Goverment) निषेध करत मनसे (MNS), भाजपतर्फे (BJP) मुंबई (Mumbai) उपनगरांत काही ठिकाणी दहीहंडी साजरी करण्यात आली. त्यामुळे नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी (Police) एकूण ६ गुन्हे दाखल केले आहेत.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने यंदादेखील दहीहंडी उत्सवावर बंदी घातली होती; मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भाजपच्या अनेक पदाधिकारी, कार्यकत्यांनी कृष्णजन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे जाहीर केले होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतच मास्क लावण्यास विरोध करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता कोरोना राजकारण्यांना आवडू लागला असल्याची उपहासात्मक टीका केली. तसेच मंदिरे सुरू केली नाहीत तर राज्यभरातील मंदिरांसमोर घंटानाद करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले, शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केला. यांच्यासाठी मंदिरे उघडी आहेत. बाकीच्यांनी मंदिरात जायचे नाही का. कोरोनाच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या लाटा जाणीवपूर्वक आणल्या जात असून लाटा यायला कोरोना म्हणजे समुद्र आहे का, या आधी देशात कधी रोगराई आलीच नाही का, असा सवाल करत राज्य सरकारला धारेवर धरले. राज्य सरकारने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी दहीहंडीवर बंदी आणली होती; मात्र बंदी झुगारत मनसेने मुंबईसह ठाण्यातही हंडी फोडून नियमांची पायमल्ली केली.

mumbai

mumbai

या पार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनीच मनसैनिकांना दहीहंडी दणक्यात साजरी करा सूचना जारी केल्या . गेल्या वर्षीच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये खूप फरक असल्याने निर्बंधांबाबत सरकार आततायीपणा करत असल्याचा आरोप करून 'लॉकडाऊन आवडे सरकारला' अशी टीका केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हडप केलेल्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या येण्याचे कमी झालेले नाही. कुठेच काही कमी झालेले नसताना सणांनाच तुम्हा कसे काय रोखता, असा सवाल त्यांनी केला.

mumbai

mumbai

कार्यकर्ते ताब्यात

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी काळाचौकी अभ्युदयनगर येथे प्रतीकात्मक दहीहंडी फोडली. या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पोलिसांनी या ठिकाणीदेखील कारवाई करीत बाळा नांदगावकर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

त्यानुसार पोलिसांनीदेखील भाजप, मनसे नेते, पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र मनसे व भाजप नेत्यांनी प्रतीकात्मक दहीहंडी उत्सव साजरा केला. या प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांनी चार पुरुष व पाच महिलांना ताब्यात घेतले.

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने निर्बंध घातले आहेत. केंद्र "" सरकारनेही याबाबत सूचना जारी केल्या आहेत. तरीही काही राजकीय कोरोनाची तिसरी लाट नेत्यांनी हट्टाने दहीहंडी साजरी केली. केरळमध्ये सुरू झाली आहे. महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी सुरू केल्या जात आहेत. पण ज्या राजकीय पक्षांना जनतेमध्ये आधार नाही ते नियमांची पायमल्ली करत आहेत.

- संजय राऊत, खासदार, शिवसेना

loading image
go to top